Soybean Bajarbhav : आज पुन्हा झाला बळीराजाचा घात ; सोयाबीन दर साडेपाच हजाराच्या आत ! वाचा आजचे सोयाबीन बाजारभाव

Soybean Bajarbhav : आज सोयाबीनच्या दरात पुन्हा एकदा घसरण झाली आहे. सोयाबीनचे सरासरी बाजार भाव साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटलच्या आत आले आहेत. यामुळे निश्चित शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढणार आहे.

खरं पाहता नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला केंद्र शासनाने स्टॉक लिमिट काढली म्हणून सोयाबीन दरात विक्रमी वाढ होईल असा अंदाज काही तज्ञांनी व्यक्त केला होता. मात्र तूर्तास तरी सोयाबीन दरात विक्रमी वाढ पाहायला मिळत नाही. सोयाबीन बाजार भाव अजूनही दबावातच आहेत. जाणकार लोकांच्या मते सोयाबीनचा चीन हा सर्वात मोठा ग्राहक आहे.

सध्या चीनमध्ये कोरोनाची परिस्थिती पूर्णपणे आटोक्यात आलेली नाही. याउलट चीनमध्ये कोरोनाची रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या परिस्थितीत चीनमधील मार्केट पूर्णपणे खुले झालेले नाही. त्यामुळे सोयाबीनचा सर्वात मोठा ग्राहक देश चीनमध्ये सोयाबीनची मागणी काही प्रमाणात कमी झाली असल्याचा अंदाज आहे. यामुळे देशांतर्गत सोयाबीन बाजार भाव दबावात आहेत.

आज राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनचे सरासरी दर साडेपाच हजार रुपये प्रतिक्विंटलच्या खालीच राहिले आहेत. मित्रांनो जसं की आपणास ठाऊकच आहे आपण रोजच सोयाबीन बाजारभावाची माहिती जाणून घेत असतो. आज देखील आपण राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सोयाबीन दराची थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 592 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 4100 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5500 प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 4800 रुपये प्रति क्विंटल नमूद करण्यात आला आहे.

लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 934 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 3300 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5630 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजारभाव 5580 रुपये नमूद करण्यात आला आहे.

कारंजा कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 6000 क्विंटल सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला ५०५० रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5590 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव ५३७५ रुपये नमूद करण्यात आला आहे.

संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज 26 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावा द्या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 5450 रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5500 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 5475 रुपये नमूद करण्यात आला आहे.

श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 55 क्विंटल सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 5000 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5700 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 5400 नमूद करण्यात आला आहे.

नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 1944 क्विंटल लोकल सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला चार हजार 660 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5284 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव ५२८४ रुपये नमूद झाला आहे.

कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज 616 क्विंटल लोकल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लीलाबाद या एपीएमसी मध्ये सोयाबीनला ४५०० रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5732 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 5505 रुपये नमूद करण्यात आला आहे.

जालना कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 5197 क्विंटल पिवळा सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 4800 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून कमाल दर पाच हजार 850 रुपये नमूद करण्यात आला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 5500 रुपये नमूद झाला आहे.

अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 4484 क्विंटल पिवळा सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 4300 प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5695 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजारभाव 5480 रुपये नमूद करण्यात आला आहे.

हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज 7516 क्विंटल पिवळा सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 4600 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5665 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 5160 रुपये नमूद करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe