अखेर मुहूर्त सापडला लेका ! सातारा जिल्ह्यातील ‘या’ रस्त्याच्या सहापदरीकरणाला सुरवात ; पण….

Satara News : सध्या महाराष्ट्रात सर्वत्र महामार्गाची कामे जोमात सुरू आहेत. यामध्ये काही काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून केले जात आहेत तर काही महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून.

सध्या महाराष्ट्र MSRDC कडून काही रस्त्याची विस्तारीकरणाची कामे देखील केली जात आहेत. यामध्ये सातारा जिल्ह्यातील शेंद्रे-कागल या सहापदरीकरणाच्या कामाचा देखील समावेश आहे. खरं पाहता या मार्गाचे सहा पदरीकरणाचे काम गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे.

मात्र यावर्षी अखेर शासनाला मुहूर्त सापडलेला दिसतोय. आता सहापदरीकरणाचे काम सुरू करण्यासाठी एम एस आर डी सी ने कंबर कसली असून महामार्गावरील झाडांची काढणी जोरात सुरू झाली आहे. या कामासाठी 3720 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

या मार्गाचे सहापदरीकरणाचे काम झाल्यानंतर शेंद्रे ते कागल प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठ सोयीचे होणार असून प्रवास अधिक गतिमान होणार आहे. आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातून राष्ट्रीय महामार्ग जातो.

यातील वळसे ते पुणे या मार्गाचे सहा पदरीकरणाचे काम झाले आहे. शेंद्रे ते कागल हा महामार्ग चौपदरी असून काँक्रिटीकरण झालेले आहे, याच महामार्गाचे आता विस्तारीकरण करण्यात येणार असून सहापदरी महामार्ग तयार केला जाणार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या मार्गाचे सहा पदरीकरणाचे काम खोळंबले असून आता याला मुहूर्त सापडला असून महामार्गा लगत असलेली मोठी झाडे तोडण्याचे काम सुरु आहे.

सातारा जिल्ह्यासाठी ही निश्चितच आनंदाची बातमी आहे. दरम्यान या महामार्गाचे दोन्ही बाजूला सेवारस्ता, सध्याच्या महामार्गात एक लेन वाढविणे, पुलांची कामे, काही ठिकाणी उड्डाणपुलांची निर्मिती, कोल्हापूर जिल्ह्यात पुराच्या पाण्याचा अडथळा येणार नाही, इतक्या उंचीचा पूल उभारणे इत्यादी कामे केली जाणार आहेत.

एकंदरीत आता शेंद्रे ते कागल हा महामार्ग लवकरच सहापदरीकरणं होईल आणि यामुळे प्रवाशांची मोठी चिंता मिटणार आहे. परंतु असे असले तरी सध्या झाडे तोडण्याची कामे सुरू आहेत त्यासाठी सुरक्षिततेसाठी कोणतीच उपाययोजना केली जात नाहीये. अनेक ठिकाणी सेवा रस्त्यावरच झाडे तुटून पडलेली आहेत.

दरम्यान सातारा पुणे हा महामार्ग बनवताना ज्या चुका झाल्या आहेत त्या चुका टाळल्या जाव्यात अशी इच्छा प्रवाशांकडून व्यक्त होत आहे. एकंदरीत या मार्गाचे विस्तारीकरण झाल्यास गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल हे काम निकाली निघणार असून सेंद्रे ते कागल या मार्गावर प्रवास करणाऱ्यांना निश्चितच दिलासा मिळणार आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe