अकोले – गुंड प्रवृत्तीच्या मंत्री जितेंद्र आव्हाड या मंत्र्याला ताबडतोब मंत्रिमंडळातून हाकला, अशी मागणी भाजपचे सरचिटणीस भाऊसाहेब वाकचौरे व इतरांनी केली.
रात्री 12 वाजता पोलीस ठाण्यात चल असे सांगून पोलीस गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यावर घेऊन जातात व बंगल्यावर जणांच्या गटाने पोलिसांसमोर मारहाण करतात. हा धक्कादायक प्रकार मंत्री करीत आहेत, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली आहे.
अन्याय झालेल्या अनंत करमुसे यांनी तक्रार दाखल केली. गेली दोन दिवस पोलिसांनी हे प्रकरण दाबून ठेवले होते. अखेर करमुसे यांच्या आग्रही भूमिकेमुळे आज पोलिसांनी पंचनामा केला.
पोलीस गाडीतून पोलीस स्टेशनमध्ये न नेता थेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यावर नेले व तेथे त्याच्या उपस्थितीत करमुसे यांना मारहाण झाली आणि पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली आहे.
तरुणाला बेदम मारहाण करणाऱ्या ना. आव्हाडांवर कारवाई करावी अशी मागणी भाजपचे तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे, भाजपचे जिप गटनेते जालिंदर वाकचौरे, सरचिटणीस भाऊसाहेब वाकचौरे,
मच्छिंद्र मंडलिक, रमेश राक्षे, सुनील उगले, राजेंद्र गवांदे, राहुल देशमुख, सुशांत वाकचौरे, राजेंद्र शेळके, वाल्मिक देशमुख, वाल्मिक नवले, सौरभ देशमुख, विजय पवार, राजेंद्र लहामगे, श्रीकांत भुजबळ आदींनी केली आहे.
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®