मुंबई :- मुंबईतील एका नामांकित वाहिनीचे सक्रीय पत्रकार यांची कोरोना चाचणी पॉझीटिव्ह आल्याने तसेच अनेक चॅनल्स असलेल्या एका मोठ्या समूहाच्या सुमारे 6 कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती आज उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना समजली,
त्यांनी तात्काळ मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त प्रविण परदेशी यांचेशी संपर्क साधून या सर्व माध्यमातील लोकांची चाचणी करावी असे निर्देश दिले.
वृत्तवाहिन्यांचे सर्वच प्रतिनिधी अहोरात्र बातम्या प्रसारणाचे काम करीत आहेत त्यांचे हे काम जोखमीचे असून त्यांनी आपले स्वास्थ्य सांभाळून काम करावे तसेच त्यांच्या सर्वत्र फिरण्यावर बंधने असावीत जेणेकरुन त्यांच्या आरोग्याची काळजी घेता येईल.
यासाठी शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्यावतीने वाहिन्यांमध्ये काम करणाऱ्या प्रतिनिधींशी संपर्क साधून त्यांची चाचणी करण्यासाठी मंत्री श्री. देसाई यांनी महासंचालक, माहिती व जनसंपर्क यांनाही सूचना दिल्या आहेत.
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®