Soybean Market : धक्कादायक ; सोयाबीन दर हमीभावापेक्षा खाली ! वाचा आजचे बाजारभाव

Ajay Patil
Published:

Soybean Market : सोयाबीन बाजारभावात सातत्याने घसरण होत आहे. यामुळे उत्पादक शेतकरी बांधवांच्या डोळ्यात पाणी आल आहे. खरं पाहता गेल्यावर्षी मालाला चांगला उच्चांकी दर मिळाला असल्याने यंदा देखील दर चांगला विक्रमी राहील अशी आशा शेतकऱ्यांना होती.

पण यावर्षी हंगामाच्या सुरुवातीपासूनच परिस्थिती उलट आहे. दर सुरुवातीपासून मोठ्या दबावात पाहायला मिळत आहेत. यामुळे उत्पादक शेतकऱ्यांची गोची होत आहे. मध्यँतरी बाजारभाव 6000 रुपये प्रति क्विंटल पर्यंत येऊन ठेपले होते. मात्र आता पुन्हा एकदा दरात मोठी घसरण होत आहे.

आज झालेल्या लिलावात देऊळगाव राजा एपीएमसी मध्ये सोयाबीनला किमान बाजार भाव तीन हजार पाचशे रुपये प्रतिक्विंटल एवढाच मिळाला आहे. म्हणजेच हमीभावापेक्षा किमान बाजार भाव कमी झाला आहे. सोयाबीनचा हमीभाव 4 हजार 300 रुपये प्रति क्विंटल एवढा आहे. निश्चितच दरवाढीच्या आशेने शेतकरी बांधवांनी सोयाबीन राखून धरला आहे.

मात्र सध्याची परिस्थिती पाहता यंदाचा हंगाम कसा राहतो याबाबत सांगत येणे कठीण बनल आहे. दरम्यान काही जाणकार लोकांनी दरात वाढ होण्याची अशा व्यक्त केली आहे. मात्र तूर्तासं कवडीमोल दरात सोयाबीन विक्री होत असल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत आज आपण राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेल्या सोयाबीन लिलावाची थोडक्यात पण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

कारंजा कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 3500 क्विंटल सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 5075 रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5465 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 5290 नमूद झाला आहे.

परळी वैजनाथ कृषी उत्पन्न बाजार समिती :– या एपीएमसी मध्ये आज चारशे क्विंटल सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला 5000 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5420 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 5255 रुपये नमूद झाला आहे.

राहता कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 57 क्विंटल सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 4701 रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5459 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 5350 नमूद झाला आहे.

कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 552 क्विंटल सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावा तेरे पी एम सी मध्ये सोयाबीनला साडेचार हजार रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5433 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 5339 नमूद झाला आहे.

मेहकर कृषी उत्पन्न बाजार समिती :- या बाजारात आज 2450 क्विंटल लोकल सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला साडेचार हजार रुपये वरती क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5850 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 5400 रुपये नमू झाला आहे. 

अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती :– या एपीएमसी मध्ये आज 4197 क्विंटल पिवळा सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला चार हजार सातशे रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5800 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे तसेच सरासरी बाजार भाव 5350 नमूद झाला आहे.

यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समिती :- या बाजारात आज 877 क्विंटल पिवळा सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला पाच हजार रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5435 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव ५२१७ रुपये नमूद झाला आहे.

चिखली कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 2390 क्विंटल पिवळा सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला चार हजार 800 रुपये प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5625 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 5210 रुपये नमूद झाला आहे.

हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती :- या बाजारात आज 4143 क्विंटल सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसी मध्ये सोयाबीनला साडेचार हजार रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5540 रुपये प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव 5060 रुपये नमूद झाला आहे.

देऊळगाव राजा कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसी मध्ये आज 30 क्विंटल सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 3500 प्रतिक्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5300 प्रतिक्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी बाजार भाव पाच हजार रुपये नमूद झाला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe