अहमदनगर Live24 टीम :- जिल्ह्यात एकीकडे ‘कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना सुरू आहेत; तर दुसरीकडे ‘सारी’चे रुग्ण वाढत आहेत कोरोनापाठोपाठ सारी (सिव्हिअरली रेक्युट रेस्पायरेटरी इलनेस) या नव्या आजाराची साथ पसरली आहे.
कोरोनापाठोपाठ सारीनेही नगर जिल्ह्यात डोके वर काढले आहे. ‘सारी’ या आजारामुळे कोपरगावात आज एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आलीय कोपरगाव तालुक्यातील एका ६५ वर्षीय महिलेचा सारी आजारामुळे मृत्यु झाला आहे.
दरम्यान या महिलेच्या कुटुंबातील ७ जणांनाही प्रशासनाने तपासणीसाठी ताब्यात घेतले आहे. याशिवाय गावातही आरोग्य यंत्रणेने सर्व्हे हाती घेतला आहे. १० तारखेला या महिलेला कोरोना संशयित म्हणून नगरच्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये पाठविले होते.
तेथे तिची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली, पण तिला सारीची लागन झाल्याचे समोर आले. कोपरगावच्या ग्रामीण रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू असताना आज सकाळी दहा वाजेच्या सुमारास तिची प्राणज्योत मालवली आहे.
अहमदनगर जिल्ह्याच्या लगतच्या जिल्ह्यात श्र्वसनाचा त्रास जाणवणारे (SARI) सारीचे रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्यात अशा प्रकारच्या रुग्णांची संख्या वाढू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने यापूर्वीच पावले उचलून त्यासंदर्भातील कार्यवाहीस सुरुवात केली आहे.
कोरोना रुग्णांच्या शोधाबरोबरच आता सारीचे रुग्णांचेही तात्काळ निदान व्हावे, यासाठी यंणत्रेने तयारी केली आहे. त्यामुळे आता तालुकास्तरावर कोविड केअर सेंटर (सीसीसी) कार्यान्वित करण्यात येणार आहे.
सारी या आजाराची लक्षणे सर्दी, ताप, खोकला अशी कोरोनासारखीच आहेत. या आजारात दोन दिवसांतच रुग्णांची तब्येत चिंताजनक होते, त्यात त्याचा मृत्यू होण्याचीही शक्यता असते.
सारीच्या रुग्णांमध्ये कोरोनासारखीच लक्षणे दिसतात, यात रुग्णाला सर्दी, ताप, खोकला येतो. त्याला श्वास घ्यायला त्रास होतो.
हे एक प्रकारचे इन्फेक्शन असते. ते विषाणूंमुळे किंवा साथीमुळे असा दोन्ही प्रकारचे असू शकते. तर कोरोनाचे इन्फेक्शन हे केवळ साथीच्या स्वरुपाचे आहे. त्यामुळे सारीचा रुग्ण हा कोरोनाही असू शकतो.
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®