अहमदनगर Live24 टीम :- कोपरगाव येथील कोरोनाबाधित महिला रुग्णाचा मंगळवारी पहाटे मृत्यू झाला. त्यामुळे अहमदनगरमध्ये कोरोनाबाधित मृतांची संख्या दोन झाली आहे.
मागील आठवड्यात श्रीरामपूर तालुक्यातील गोवर्धन येथील एका तरूणाला कोरोनामुळे जीव गमवावा लागला. आता या महिलेच्या मृत्यूमुळे जिल्ह्याची चिंता वाढली आहे.
दरम्यान अकोले तालुक्यातील एका १५ वर्षीय मुलाचा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना आज मृत्यू झाला आहे. त्याच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.
या मुलाच्या घशातील स्रावाचे नमुने सोमवारी घेण्यात आले असून ते तपासण्यासाठी पुण्याला पाठविण्यात आलेले आहेत. तो अहवाल अद्याप आलेला नाही.
हा मुलगा ठाणे जिल्हयात शाळेला होता. २८ मार्चला तो अकोले तालुक्यात गावी आला होता. या मुलामध्ये कावेळी तसेच रक्ताक्षयाची लक्षणेही होती, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे.अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण समजू शकेल.
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®