हाँगकाँग : कोरोनाच्या उद्रेकानंतर जगभरात मास्कची मागणी चांगलीच वाढली आहे. सर्वसामान्यांच्या चेहऱ्यावर दिसणारे मास्क आजारापासून पूर्ण संरक्षण करू शकत नाहीत.
विशिष्ट प्रकारच्या मास्कची किंमत सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरची असल्याने हाँगकाँगमधल्या तरुणाने विषाणू मारणारा मास्क तयार केला आहे. महत्त्वाचे म्हणजे हा मास्क धुऊन पुन्हा वापरता येणार आहे.
‘सन ऑफ स्टार’ या नावाने हाँगकाँगमध्ये ओळखल्या जाणाऱ्या स्टार्क चॅन यीक-हेई याने फोटोकॅटेलिक कोटिंग असलेले मास्क तयार केले आहेत. या मास्कमध्ये असलेल्या अल्ट्रा व्हॉयलेट किरणांमुळे विषाणूंना मारले जाते.
कोरोनाच्या उद्रेकानंतर मास्कसारखी छोटी; परंतु अतिमहत्त्वाची वस्तू घेण्यासाठी नागरिकांच्या लागत असलेल्या रांगा महिनाभरापासून पाहतोय.
त्यातून नागरिकांची सुटका आणि त्यांचे संरक्षण करण्यासाठी खास पद्धतीचे मास्क तयार करण्याची कल्पना सुचल्याचे स्टार्कने सांगितले. हाँगकाँग विद्यापीठात या मास्कची चाचणी सुरू आहे.
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®