प्रवरा नदीत बुडणाऱ्याला तरुणाने वाचविले

Ahmednagarlive24
Published:

अकोले: अकोले तालुक्यातील ढोकरी येथे प्रवरा नदीच्या पाण्यात यशवंत डोळस हे पोहत होते. पोहत असताना ते दोन धाऱ्यापर्यंत पोहचले अन् गटांगळ्या खाऊ लागले. समोरच नदीच्या काठावर उभ्या असलेल्या अर्जुन पथवे या आदिवासी तरुणाच्या हे लक्षात आले.

त्याने आपला जीव धोक्यात घालून थेट नदीत उडी घेतली आणि बुडणाऱ्या यशवंतचे प्राण वाचविले. शनिवार,दि.११ रोजी दुपारची ही घटना आहे. यशवंत डोळस हे व्यायाम होईल म्हणून नदीवर केवलवाडीच्या डोहातील धारेमध्ये पोहत होते.

अचानक खोल पाण्यात ते गटांगळ्या खावू लागले. त्यावेळी तेथून बऱ्याच अंतरावर अर्जुन पथवे हा आदिवासी मुलगा उभा होता. त्याच्या ते लक्षात आले. त्याने कसलाही विचार न करता थेट पाण्यात उडी मारली.

त्या तरुणाने स्वत:चा जीव धोक्यात घालून पाण्यात बुडणाऱ्या यशवंत यांना वाचविले. त्यानंतर यशवंत डोळस यांना मोटारसायकलवरून ढोकरीला आणण्यात आले. आज अर्जुन पथवेने यशवंत डोळस यांचा जीव वाचवला.

अर्जुनच्या आई सुमन पथवे यांनी देखील सहा वर्षापूर्वी उंचखडक -ढोकरीच्या शिवेवर असणाऱ्या बंधाऱ्यात शिवतेज विकास शेटे या तीन वर्षाच्या मुलाला पाण्यात बुडताना वाचविले होते.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment