Whatsapp new feature : व्वा! आता मेसेजसाठीही येणार ‘व्ह्यू वन्स’ फीचर

Ahmednagarlive24 office
Published:

Whatsapp new feature : व्हॉट्सॲपच्या वापरकर्त्यांसाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. कारण व्हॉट्सॲप लवकरच आणखी एक जबरदस्त फीचर आणण्याच्या तयारीत आहे.

नुकतेच व्हॉट्सॲपने व्हॉट्सॲप अवतार हे फिचर आणले आहे. अशातच आता व्हॉट्सॲप मेसेजसाठी व्ह्यू वन्स फीचर आणत आहे. त्यामुळे व्हॉट्सॲप चॅटची सुरक्षा दुप्पट होईल.

WABetainfo वेबसाइटने या नवीन फीचरची माहिती दिली आहे. Android 2.22.25.20 साठी WhatsApp बीटा अपडेट Google Play Store वर प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यामुळे व्हॉट्सॲप लवकरच हे फीचर आणण्याच्या तयारीत आहे.

या फीचरच्या मदतीने ग्राहकांचे चॅट अधिक सुरक्षित होणार आहे. मेसेज एकदा पाहिल्यानंतर तो आपोआप डिलीट होतो. म्हणजे इतर वापरकर्ते तुमचा मेसेज फक्त एकदाच पाहतील. त्याचबरोबर त्यांना मेसेजचा स्क्रीनशॉट घेता येणार नाही.

असे करेल काम

ग्राहकांची प्रायव्हसी लक्षात घेऊन हे फिचर तयार केले आहे. हे फिचर सध्या केवळ मीडिया फायलींसाठी जारी करण्यात आले आहे. लवकरच आता कंपनी ते टेक्स्ट मेसेजसाठीही जारी करणार आहे.

इतर ग्राहकांना तुमचा मेसेज कोणालाही पाठवता आणि त्याचा स्क्रीनशॉट घेता येणार नाही. फीचर रोलआऊट झाल्यानंतर, तुम्हाला आय बटनमध्ये आणखी एक नवीन व्ह्यू-ओन्स फिचर पर्याय दिसेल, ज्यावर टॅप करून तुम्ही पाठवलेले संदेश एकदाच उघडू शकणार आहात.

Whatsapp अवतार

दरम्यान व्हॉट्सॲपने शुक्रवारी आपला जबरदस्त फिचर अवतार जारी केला आहे. या फिचरच्या मदतीने, तुम्ही तुमचे अवतार डिझाइन करून ते इतर लोक आणि मित्रांना पाठवता येईल. या फीचरमुळे ॲप वापरण्याची मजा दुप्पट होणार आहे.

तो अवतार तुम्ही व्हॉट्सॲप प्रोफाइल फोटोवरही लावू शकता. त्याशिवाय हा अवतार व्हॉट्सॲप प्रोफाइल फोटोसह चॅटिंगमध्ये चॅट स्टिकर म्हणून वापरता येईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe