जिल्हाधिकारी राहुल द्विवेदींच्या दक्ष, संवेदनशील व कर्तव्य तत्पर कार्यशैलीचा पुन:प्रत्यय

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर : आजारी असलेल्या आईच्या औषधासाठी मुलाने थेट साद घातली ती जिल्हाधिकाऱ्यांना! त्यानंतर त्या सादेला प्रतिसाद देत पाउण तासात आवश्यक असलेली औषधे मुकुंदनगर येथील त्या मुलाच्या घरी पोहोच झाली.

या घटनेतून जिल्हाधिकारी राहुल द्विवेदींच्या दक्ष, संवेदनशील व कर्तव्य तत्पर कार्यशैलीचा पुन:प्रत्यय आला नसेल तर नवल ! कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे आदेश जारी आहेत.

मुकुंदनगरमध्ये कोरोनाबाधित सापडल्याने या भागातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हा भाग शुक्रवार दि.१० एप्रिल पासून सीलबंद केला आहे. हा भाग ‘हॉटस्पॉट’ म्हणून घोषित करून या भागातील अत्यावश्यक सेवेसह सर्व सेवा १४ एप्रिलपर्यंत बंद राहणार आहेत.

येथील किराणा दुकाने, औषध दुकाने व अन्य दुकानेही बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे या भागांतील दैनंदिन गरजांच्या पूर्ततेची जबाबदारी महापालिकेवर देण्यात आली आहे. त्यानुसार शनिवारपासून त्याची सुरुवात झाली.

महापालिकेने अत्यावश्यक सेवांची मागणी नोंदविण्यासाठी हेल्पलाइन क्रमांक दिले आहेत. त्यामुळे या हेल्पलाइन क्रमांकावर औषधासाठी मुकुंदनगर येथील नागरिक शाहरूख सिद्दीकी हे रविवारी सायंकाळी संपर्क करीत होते.

जवळपास दोन तास संपर्क करून देखील हेल्पलाइन बिझीच येत होती. अखेर सिद्दीकी याने रविवारी रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी आपल्या अडचणीबाबत ट्विट केले.

द्विवेदी यांनीही तातडीने ट्विटची दखल घेऊन त्वरित रिप्लाय करीत प्रि्क्रिरप्शन मागितले. तसेच संबंधित औषधे प्रशासकीय यंत्रणेमार्फत सिद्दीकी यांच्यापर्यंत पोहचवली.

जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून थेट घरपोच झालेली आवश्यक औषधे पाहून सिद्दीकी परिवार स्तिमीत झाला. या तत्पर मदतीबद्दल या परिवाराने प्रशासन व प्रशासन प्रमुखांचे शतश: आभार व्यक्त केले आहेत.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment