संगमनेर :- वरिष्ठांकडून दिलेले पावत्यांचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी संगमनेरमधून जाणाऱ्या नाशिक-पुणे मार्गावर वाहनचालकांची लूट सुरू आहे.
ही लुटमार करणारे कोणी गुंड नव्हेत, तर ज्यांच्यावर या मार्गाची जबाबदारी सोपवली आहे, असे महामार्ग आणि जिल्हा वाहतूक शाखेचे पोलिस आहेत.

हिवरगाव पावसा टोलनाक्यावर दोन्ही दिशेने पोलिसांचे हे वसुलीनाके सुरू असून येथून जाणाऱ्या सर्वसामान्य वाहनचालकांना त्यांचा सामना करताना आर्थिक भुर्दंड बसत आहे.
नाशिक-पुणे मार्गावर दररोज हजारो वाहनांची ये-जा असते. त्यामुळे अपघातांचे प्रमाणदेखील मोठे आहे. अपघातग्रस्तांना मदत मिळावी यासाठी या मार्गावर चंदनापुरी घाटात महामार्ग पोलिसांचे कार्यालय आहे.
कऱ्हे घाट ते आळे खिंड आणि निमगाव जाळी ते शेंडी (भंडारदरा) असे त्यांचे कार्यक्षेत्र आहे. याशिवाय संगमनेर शहरातील वाहतुकीची समस्या लक्षात घेऊन पोलिस अधीक्षकांनी जिल्हा वाहतूक शाखा काही दिवसांपूर्वी कार्यान्वित केली.
घुलेवाडी येथे या शाखेचे कार्यालय सुरू आहे. मात्र, आता या शाखेची ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशी स्थिती आहे. सकाळी तास-दोन तासांसाठी काही ठरावीक वेळ कार्यालय सुरू असते. एरवी ते बंदच असते.
अधिकाऱ्यांसह वाहतूक पोलिस सरकारी वाहनातून नाशिक-पुणे आणि कोल्हार-घोटी मार्गावर निघून जातात. संगमनेरसाठी स्वतंत्र वाहतूक शाखा देऊनही येथील वाहतुकीची समस्या ‘जैसे थे’च आहे.
- तब्बल ४० वर्षानंतर भोजापूर धरणाचे पाणी नान्नज दुमाला शिवारात पोहोचले, शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण
- PM मोदींच्या एका परदेश दौऱ्याचा खर्च तब्बल 74 कोटी, वर्षभरातील आकडे ऐकून धक्का बसेल! पाहा कोणता दौरा होता सर्वात खर्चिक?
- अहिल्यानगरमध्ये लवकरच १५ कोटी रूपयांचे संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांची ग्वाही
- आज नाग पंचमीच्या शुभ दिवशी 3 राशींवर होणार धनवर्षाव! पाहा कोणत्या आहेत या भाग्यवान राशी?
- राष्ट्रीय सहकार धोरणामुळे भारताच्या प्रगतीत भर पडणार, युवा नेते विवेक कोल्हे यांचे प्रतिपादन