संगमनेर :- नाशिक-पुणे मार्गावरील बाह्यवळणावर शुक्रवारी पहाटे अडीचच्या सुमारास मालट्रकची धडक बसून मोटारसायकलीवरील बाप-लेकीचा मृत्यू झाला.
अन्य दोन जण गंभीर जखमी झाले. अत्यवस्थ असलेल्या दोन्ही जखमींवर संगमनेरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अशोक सोमनाथ वाघ (वय ३५, कळस, ता. अकाेले) आणि त्यांची तीन वर्षांची चिमुरडी शकुंतला यांचा मृतात समावेश आहे. त्यांची पत्नी आशाबाई व दिलीप भाऊसाहेब मेंगाळ हे दोघे गंभीर जखमी झाले.
वाघ कुटुंबीय गुरुवारी शहरानजीक असलेल्या कासारवाडी येथे यात्रेनिमित्ताने नातेवाईकांकडे आले होते. रात्री उशिराने यात्रा संपवून ते आपल्या मोटारसायकलीवरून अकोल्याच्या दिशेने निघाले होते.
अकोलेनाका येथील बाह्यवळण मार्गावर मालपाणी स्क्वेअरजवळून जात असताना नाशिकच्या दिशेने पुण्याकडे सिमेंटचे ठोकळे घेऊन जाणाऱ्या मालट्रकची (एम. एच. ४३, यू ७४९१) त्यांना जोराची धडक बसली.
अपघातात बापलेकीचा जागीच मृत्यू झाला. दुचाकीवरील अन्य दोन जण गंभीर जखमी झाले. जखमींची प्रकृती िचंताजनक असल्याची माहिती मिळाली.
- अहिल्यानगर शहरात महानगरपालिका चार आपले सरकार केंद्र सुरू करणार आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांची माहिती
- Suzlon Energy Share Price: सुझलॉन एनर्जीचा शेअर खरेदी करावा का? बघा तज्ञांनी दिलेली रेटिंग
- Vikram Solar Share Price: विक्रम सोलरचा शेअर मार्केट गाजवणार? आज झाली 11.80 अंकांची वाढ…SELL करावा की HOLD?
- Sun Pharma Share Price: सन फार्मा आज रॉकेट! नफा मिळवण्याची संधी? वाचा सध्याची पोझिशन
- Bajaj Auto Share Price: 1 महिन्यात 13.95% तेजी! आज मात्र?…वाचा अपडेट