iPhone 14 : जबरदस्त..! आता iPhone 13 पेक्षा स्वस्तात खरेदी करता येतोय iPhone 14, वाचणार 21660 रुपये

Ahmednagarlive24 office
Published:

iPhone 14 : तुमच्याकडे आता स्वस्तात आयफोन खरेदी करण्याची संधी आहे. iPhone 14 वर जबरदस्त सवलत मिळत आहे. सवलतींमुळे तुमचे 21660 रुपये वाचणार आहेत. ही संधी फ्लिपकार्टवर मिळत आहे.

काही दिवसांपूर्वी iPhone 14 लाँच झाला होता. कंपनीने यामध्ये उत्कृष्ट फीचर्स दिली आहेत. त्यामुळे स्वस्तात जबरदस्त फीचर्स असणारा स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी गमावू नका.

येथे मिळत आहे ऑफर

आयफोन 14 128GB ची मूळ किंमत 79,900 रुपये असली तरी आता फ्लिपकार्टवर 1160 च्या सवलतीसह तो 78,740 रुपयांना खरेदी करता येणार आहे. त्यामुळे स्वस्तात आयफोन खरेदी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे आहे.

21,660 रुपयांनी स्वस्त

फ्लिपकार्ट या आयफोनवर तब्बल 20,500 रुपयांपर्यंतचा एक्सचेंज बोनस देत आहे. त्यामुळे तुमच्याकडे एक्सचेंजसाठी जुना फोन असेल तर तुम्हाला iPhone 14 वर 20,500 रुपयांपर्यंतची सवलत मिळेल. सवलतीनंतर या फोनची किंमत फक्त 58,240 रुपये असणार आहे. म्हणजेच मूळ किमतीपेक्षा 21,660 रुपये स्वस्त.

फक्त 1 रुपयांमध्ये 999 रुपयांचे OTTplay प्रीमियम सब्सक्रिप्शन

त्याचशिवाय या आयफोनवर इतर ऑफर उपलब्ध आहेत, या ऑफर तुम्ही फ्लिपकार्टवर जाऊन पाहू शकता. यामध्ये OTTplay Premium चे Rs 999 चे सब्सक्रिप्शन फक्त Rs 1 मध्ये मिळत आहे. यामध्ये SonyLIV, Zee5, Lionsgate Play, ShemarooME, ShortsTV यांचा समावेश आहे.

हा iPhone लाँच केल्यानंतर Apple ने iPhone 13 च्या किमती कमी केल्या होत्या. सध्या, iPhone 13 128GB व्हेरिएंट Apple च्या अधिकृत वेबसाइटवर 69,900 रुपयांना उपलब्ध आहे. म्हणजेच, या डीलचा फायदा घेऊन तुम्ही स्वस्तात iPhone 14 खरेदी करू शकता.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe