Maharashtra Government Employee : राज्य कर्मचाऱ्यांसंदर्भात वित्त विभागाचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय जारी ; काय दंडलंय या जीआर मध्ये वाचा

Published on -

Maharashtra Government Employee : महाराष्ट्र राज्य वित्त विभागाकडून राज्य कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. वित्त विभागाने 16 डिसेंबर 2022 रोजी कर्मचाऱ्यांना विमान प्रवास सवलत अनुज्ञय करण्याबाबत एक अति महत्त्वाचा असा जीआर काढला आहे. अशा परिस्थितीत आज आपण महाराष्ट्र राज्य वित्त विभागाने जारी केलेल्या या शासन निर्णयात नेमकं काय दडलं आहे याविषयी जाणून घेणार आहोत.

आम्ही आपणास सांगू इच्छितो की, 16 डिसेंबर 2022 रोजी जारी झालेल्या जीआरच्या माध्यमातून न्यायालयीन व विधीमंडळाशी संबंधित कामकाजाव्यतिरिक्त अन्य अत्यावश्यक शासकीय कामकाजासाठी मंत्रालयीन / क्षेत्री अधिकारी व कर्मचाऱ्यांना विमान प्रवास करण्यास शासनाकडून सशर्त परवानगी देण्यात येत आहे.

जीआर झाला असला तरी देखील यामध्ये काही अटी दिल्या आहेत ज्याचे पालन करणे अनिवार्य राहणार आहे. या निर्णयात असं म्हटलं आहे की, अन्य कोणत्याही मार्गाने नियोजित ठिकाणी विहीत वेळेत पोहोचणे शक्य नसल्यास संबंधित प्रशासकीय विभागाच्या सचिवांची पुर्वपरवानगी घेवून कर्मचाऱ्यांना सरकारी कामासाठी विमान प्रवास करता येणार आहे.

मात्र ही सेवा केवळ जाण्यासाठी राहणार आहे, परतीच्या प्रवासासाठी ही सवलत अनुज्ञेय राहणार नसल्याचे त्या जीआर मध्ये नमूद आहे. पण अपवादात्मक परिस्थितीत परत येणे तातडीचे असले तर संबंधित विभागाच्या सचिवांची लेखी पूर्वपरवानगी घेऊन परतीचा प्रवास देखील करता येणार आहे. केवळ अपवादात्मक परिस्थितीत आणि गरजेचे असल्यासचं ही सेवा मिळणार आहे.

तसेच हा विमान प्रवास कर्मचाऱ्यांना अल्प दरात सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांच्या विमानातून करावा लागणार आहे. तसेच प्रवास हा इकॉनॉमिक क्लासने केला जाऊ शकतो. जर बिझनेस क्लास मधून संबंधित कर्मचाऱ्यांनी प्रवास केला तर यासाठी खर्चाची प्रतिकृती

सरकारकडून केली जाणार नाही असे देखील सदर जीआर मध्ये सांगितले गेले आहे. निश्चितच राज्य कर्मचाऱ्यांच्या विमान प्रवासा संदर्भात हा एक महत्त्वाचा जीआर आहे. हा शासन निर्णय सविस्तर जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

Click Here To See GR 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News