Xiaomi Mi Fan Festival 2022 : तुम्ही आता स्वस्तात स्मार्ट टीव्ही खरेदी करू शकता. कारण Xiaomi Mi Fan Festival 2022 सेलला सुरुवात झाली आहे. यामध्ये तुम्हाला स्मार्ट टीव्ही, स्मार्टफोनसह अनेक प्रोडक्ट्सवर जबरदस्त डिस्काउंट मिळत आहे.
या सेलची सुरुवात 15 डिसेंबर पासून सुरुवात झाली असून तुम्ही 21 डिसेंबरपर्यंत फायदा घेऊ शकता. रेडमीचा 32 इंच HD Ready स्मार्ट टीव्ही तुम्ही निम्म्या किमतीत खरेदी करू शकता.
पहा किंमत आणि ऑफर :
हा 32 इंचाचा टीव्ही असून यामध्ये HD रेडी स्क्रीन आहे. याची मूळ किंमत 24,999 रुपये इतकी आहे. तरी तो तुमची निम्म्या किमतीत ते घरी नेऊ शकता. हा टीव्ही आता तुम्ही12,499 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. तसेच इंडसइंड क्रेडिट कार्डने पेमेंट केले तर तुम्हाला 2,000 रुपयांपर्यंतची सूट मिळेल. Mi कूपनसोबत अतिरिक्त सवलत मिळत आहे.
फीचर्स
याचा1366 x 768 पिक्सेल रिझोल्यूशनसह 32-इंचाचा HD रेडी डिस्प्ले आहे. तर रिफ्रेश दर 60 Hz आहे. यामधल्या ग्राहकांसाठी 2 शक्तिशाली स्पीकर दिले आहेत. त्याची ऑडिओ पॉवर 20W इतकी आहे.
हे डॉल्बी ऑडिओसह येते. तसेच या टीव्हीमध्ये पॅचवॉल 4 दिले आहे. महत्त्वाची बाब म्हणजे यामध्ये 75+ मोफत लाइव्ह चॅनेल दिले आहेत. यामध्ये किड्स मोड देण्यात आला आहे. हे ब्लूटूथ 5.0 कनेक्टिव्हिटीसह येतो.
हा क्वाड कोअर A35 CPU देण्यात आला आहे. स्टोरेजचा विचार केला तर यामध्ये 1 GB रॅम आणि 8 GB स्टोरेज दिले आहे. हा Android TV 11 वर काम करते. तसेच यामध्ये गुगल व्हॉइस असिस्टंट सपोर्ट आणि क्रोम-कास्ट इन-बिल्ट आहे.