कोरोनावर मात करण्यासाठी आपण सर्वांनी लॉकडाऊनचे नियम पाळणे अत्यंत गरजेचे

Ahmednagarlive24
Published:

संगमनेर :- आज संपूर्ण जग कोरोना या विषाणूजन्य आजाराने भयभीत झाले आहे. जगभरात कोरोनाने मोठ्या प्रमाणात लोक मृत्यूमुखी पडले आहेत.

अनेक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे कोरोनावर मात करण्यासाठी लॉकडाऊनचे नियम पाळा, असे भावनिक आवाहन अमेरिकास्थित संगमनेर तालुक्यातील सावरगाव तळचे भुमीपुत्र राजेंद्र गाडे यांनी केले आहे.

अमेरिकेत एक महिन्यांपूर्वी लॉकडाऊन केले, तेव्हा खूपच कमी रुग्ण होते. परंतु, आज येथे खूपच भयंकर परिस्थिती असून दररोज येथे ३० ते ३५ हजार एवढ्या झपाट्याने नवीन रुग्ण कोरोना बाधित होत आहेत.

आजपर्यंत अमेरिकेत सहा लाख लोकांपेक्षा अधिक लोक या आजाराने बाधित झालेले आहेत. अशीच परिस्थिती आज युरोप खंडातील अतिशय प्रगत अशा इटली, स्पेन, जर्मनी, इंग्लंड, फ्रान्स या देशाची झाल्याने हे सर्व देश आज हवालदिल झालेले आहे.

अमेरिकेचा विचार करता येथे आतापर्यंत २५ हजारपेक्षा अधिक लोक मृत्यमुखी पडले आहेत. अमेरिकेत आम्ही जेथे राहतो त्या एकट्या न्यूयॉर्क आणि न्यूजर्सी शहरांत १२ हजारपेक्षा अधिक लोक या आजारामुळे मृत्यूमुखी पडले आहेत.

यामुळे आपल्या सर्वांच्या लक्षात येत असेल हा किती भयंकर आजार आहे. अगदी लहान बाळापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत कोणीही या आजारापासून सुटू शकत नाही. यामुळे या आजारापासून बचाव करण्याचा सध्याचा एकमात्र उपाय म्हणजे सर्वांनी घरीच थांबले पाहिजे.

मी स्वत: संगणक अभियंता असल्याने येथे घरूनच माझे ऑफिसचे काम पूर्ण करतो. पत्नी फार्मासिटीकल क्षेत्रात काम करत असल्याने तिला दिवसाआड ड्युटीवर जावे लागते.

परंतु, स्वत:ची सर्व सुरक्षेची काळजी घेऊनच ती कामावर जाते. त्यामुळे कोरोनावर मात करण्यासाठी आपण सर्वांनी लॉकडाऊनचे नियम पाळणे अत्यंत गरजेचे आहे असे भावनिक आवाहन गाडे यांनी केले आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment