अहमदनगर क्राईम न्यूज : नवऱ्याचा मोबाईल तपासल्याने बायकोस मारहाण !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24  :- श्रीगोंदा तालुक्‍यातील आढळगाव येथे राहात असलेली विवाहित तरुणी सौ. रुपाली विशाल छत्तीसे, वय २४ हिने तिचा पती विशाल अंकुश छत्तीसे याचा मोबाईल चेक केला ,याचा राग आल्याने आरोपी नवरा विशाल अंकुश छत्तीसे, संजना अंकुश शिंदे, अंकुश किशन छत्तीसे, रा. आढळगाव यांनी मारहाण करुन रुपाली हिला ढकलून दिले.

ती भिंतीवर आदळून डोक्याला व कानाला मार लागून जबर जखमी झाली. संजना म्हणाली की, ती जास्त बोलते हिला जिवे मारा, त्यावर आरोपी अंकुश छत्तीसे म्हणाला की, तिला मारा, पुढे काय काय होते पाह, अशी धमकी दिली.

जखमी रुपाली विशाल छत्तीसे हिने वरीलप्रमाणे फिर्याद दिल्यावरुन आरोपी विशाल अंकुश छत्तीसे, संजय अंकुश शिंदे, अंकुश किसन छत्तीसे यांच्याविरुद्ध श्रीगोंदा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment