राज्य उत्पादन शुल्क विभागाचे धाडसत्र सुरुच

Ahmednagarlive24
Published:
मुंबई दि.16अवैध मद्य निर्मितीवाहतूकविक्रीविरुद्ध राज्य उत्पादन शुल्क विभागाचे राज्यस्तरावर धाडसत्र सुरु आहे. काल दिनांक 15 एप्रिल 2020 रोजी राज्यात 112 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून  40 आरोपींना अटक करण्यात आली आहे. याबरोबरच 5 वाहने जप्त करण्यात आली असून 32 लाख 34 हजार रुपये किमतीचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

24  मार्च 2020 ते 15 एप्रिल 2020 पर्यंत राज्यात 2 हजार 809 गुन्हे नोंदविण्यात आले असून 1 हजार 143 आरोपींना अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत 162 वाहने जप्त करण्यात आली असून 7 कोटी 17 लाख रुपये किंमतीचा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचा नियंत्रण कक्ष २४×७ सुरू
अवैध मद्य निर्मितीवाहतूक व विक्री विरुद्ध तक्रार स्वीकारण्याकरिता राज्य उत्पादन शुल्क विभागाचा नियंत्रण कक्ष २४×७ सुरू आहे.या  नियंत्रण कक्षाचा टोल फ्री दूरध्वनी क्रमांक १८००८३३३३३३ तर व्हाट्सअँप क्रमांक ८४२२००११३३  आहे. या क्रंमाकावर तक्रारदार आपली तक्रार नोंदवू शकतात. तक्रार करणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येत असल्याने नमूद क्रमांकावर अवैध मद्याबाबतची तक्रार नोंदविण्यात यावी असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांनी केले आहे.
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe