रब्बी हंगामात शेतकऱ्यांना दिलासा ! ‘या’ खतांचे दर झालेत कमी ; डिटेल्स वाचा

Ajay Patil
Published:

Agriculture News : रब्बी हंगामातील पिकांची पेरणी आता सर्वत्र जवळपास पूर्ण झाली आहे. आता रब्बी हंगामातील पीक वाढीच्या अवस्थेत आहे. शेतकऱ्यांनी गहू जवस हरभरा करडई यांसारख्या पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे.

मका पिकाची देखील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पेरणी या हंगामात केली आहे. अशा परिस्थितीत पिकांच्या जोमदार वाढीसाठी शेतकऱ्यांना खतांची आवश्यकता आहे. याच पार्श्वभूमीवर एक अतिशय दिलासादायक बातमी समोर येत आहे.

खरं पाहता रब्बी हंगामातील पीक जोमदार वाढावे म्हणून शेतकरी बांधव डीएपी आणि युरिया या दोन खतांची मोठ्या प्रमाणात मागणी करत असतात. या खतांची पिकांच्या वाढीसाठी आवश्यकता असते.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

याच खतांच्या दरात आता मोठी कपात झाली आहे. यामुळे कुठे ना कुठे रब्बी हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असल्याचे चित्र आहे. निश्चितच शेतकरी बांधवांना खतांवर प्रत्येक हंगामात मोठा पैसा खर्च करावा लागतो. त्यामुळे उत्पादन खर्चात वाढ होते.

मात्र आता डीएपी आणि युरिया या दोन खतांच्या किमतीत घट झाली असल्याने आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे चित्र आहे. खरं पाहता, गेल्या रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात खत टंचाई निर्माण झाली होती. विशेष म्हणजे यावर्षी देखील विदर्भातील काही जिल्ह्यात युरिया टंचाई असल्याची बातमी समोर आलेली आहे.

मात्र राज्यातील इतर भागात यंदा खत टंचाई जाणवलेले नाही. शिवाय आता खतांच्या किमतीमध्ये घसरण झाली असल्याने निश्चितचं शेतकऱ्यांना दिलासा मिळेल यात तीळ मात्र देखील शंका नाही. अशा परिस्थितीत आज आपण डीएपी आणि युरिया खताचे ताजे दर जाणून घेणार आहोत.

मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की भारत वर्षात सध्या डीएपी 1350 रुपये प्रति बॅग या दरात विक्री होत असून युरिया 276 रुपये प्रति बॅग दराने विकला जात आहे.

निश्चितच या दोन खतांच्या किमती नियंत्रित असल्याने याचा शेतकऱ्यांना फायदा होईल त्यांच्या उत्पादन खर्चात बचत होईल आणि उत्पादनात वाढ होण्यास मदत होईल.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe