पुणे :- औरंगाबाद महानगरपालिकेतील एमआयएमचा बडतर्फ नगरसेवक मतीन रशीद सय्यद याने औरंगाबाद मनपातील नगरसेविकेचे अपहरण करून पिस्तुलाचा धाक दाखवत तसेच गुंगीचे औषध देऊन बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे.
तसेच मतीन सय्यद याचा भाऊ माेहसीन रशीद सय्यद व मेहुणा हामेद सिद्दिकी यांनीही आपला विनयभंग केल्याचे नगरसेविकेने म्हटले आहे.
याबाबत पीडित नगरसेविकेने चाकण पाेलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मतीन याने आपल्यावर पुणे, शिक्रापूर, औरंगाबादेत वेगवेगळ्या ठिकाणी अत्याचार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
- जनतेचे प्रश्न सोडवा अन्यथा बदली करून घ्या ! जलसंपदामंत्री विखे पाटील यांचा इशारा ; पारनेर येथे अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक
- चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन केंद्रीय सचिव संजय जाजू यांच्या प्रमुख उपस्थितीत आज होणार संपन्न
- सोयाबीनच्या आगमनाने सुर्यफुलाचे दर्शन दुर्मिळ
- बीड प्रकरणातील दोषींना थारा दिला जाणार नाही : अजित पवार
- भूकंपाची पूर्वसूचना देणारी प्रणाली विकसित करण्याची गरज : पंतप्रधान