Soybean News : सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी नववर्षाचा पहिलाच दिवस निराशाजनक असा सिद्ध झाला आहे. खरं पाहता नववर्षात सोयाबीन दरात वाढ होण्याचे आशा सोयाबीन उत्पादकांना आहे. मात्र पहिल्याच दिवशी सोयाबीन दरात मोठी घसरण झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
खरं पाहता आज पैठण कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेल्या लिलावात सोयाबीनला मात्र 4550 रुपये प्रतिक्विंटलचा सरासरी दर मिळाला आहे. साहजिकच हा दर हमीभावापेक्षा अधिक भासत असला तरी देखील या एवढ्या दरात सोयाबीनची विक्री केल्यास शेतकऱ्यांना कवडीमोल अस उत्पन्न मिळणार आहे. कारण की यावर्षी पावसाच्या लहरीपणामुळे सोयाबीन उत्पादनात मोठी घट झाली आहे.
शिवाय सोयाबीन उत्पादित करण्यासाठी उत्पादन खर्च अधिक लागला आहे. यामुळे सोयाबीनला कमीत कमी सहा हजार रुपये प्रति क्विंटल ते सात हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंतचा सरासरी दर मिळावा अशी आशा शेतकऱ्यांना आहे. मात्र तूर्तास तरी सोयाबीन दर दबावात आहेत यामुळे शेतकरी बांधवांची डोकेदुखी वाढली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा
मित्रांनो जसं की आपणास ठाऊकच आहे की, आपण रोजच सोयाबीन दराची माहिती जाणून घेत असतो. आज देखील आपण राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये झालेल्या सोयाबीन लिलावाची माहिती थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
पैठण कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 13 क्विंटल पिवळा सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये सोयाबीनला या मार्केटमध्ये 4500 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5177 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 4550 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
आष्टी- कांरजा कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 85 क्विंटल पिवळा सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये सोयाबीनला या मार्केटमध्ये 4900 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5360 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 5175 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
समुद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 33 क्विंटल पिवळा सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये सोयाबीनला या मार्केटमध्ये 5100 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5350 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 5200 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.