पुणे : राज्यातील मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांत मागील दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.
दरम्यान, २१ एप्रिलपर्यंत याच भागातील काही ठिकाणी गारपीट, सोसाट्याचा वारा, मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस सुरूच राहणार आहे.सध्या एप्रिल महिन्याचा तिसरा आठवडा सुरू झाला असून, राज्यातील उन्हाचा तडाखा वाढू लागला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार दोन दिवसांपूर्वी दक्षिणपूर्व मध्य प्रदेशापासून विदर्भ पार करून पुढे दक्षिण तामिळनाडूची किनारपट्टी, तसेच तेलगंणा आणि दक्षिण कर्नाटकपर्यंत द्रोणीय स्थिती तयार झाली आहे.
यामुळे वादळे वारे तयार झाले आहे. त्याबरोबरच हिंदी महासागरापासून ते दक्षिणपूर्व अरबी समुद्र आणि केरळच्या किनारपट्टीपर्यंत समांतर द्रोणीय स्थिती तयार झाली आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर This Story First Publish on Ahmednagarlive24.com®