भावा वावर है तो पॉवर है ! शेतीमाल विकायला गेले पिकअपने आणि परतले चक्क विमानाने, अख्ख्या महाराष्ट्रभर रंगली चर्चा

Published on -

Viral News : भारत हा कृषिप्रधान देश आहे. मात्र शेती करताना शेतकऱ्यांना नानाविध अशा अडचणींचा सामना करावा लागतो. निसर्गाच्या दुष्टचक्रामुळे शेतकऱ्यांना अतिशय कवडीमोल उत्पादन मिळतं आणि सरकारच्या उदासीन धोरणामुळे बाजारात शेतमालाला अतिशय कवडीमोल दर मिळतो.

मात्र सुलतानी आणि आसमानी संकटांचा सामना करत बळीराजा राजासारखा जगतो, आपल्या निधड्या छातीवर संकटाची मालिका सोसत अक्ख्या जगाचे पोट भरतो. दरम्यान बळीराजाला, शेतकऱ्याला राजा का म्हणतात याचे एक उत्तम उदाहरण उस्मानाबाद जिल्ह्यातून समोर आला आहे.

त्याच झालं असं जिल्ह्यातील दोन प्रयोगशील रेशीम उत्पादक शेतकऱ्यांनी रेशीम विक्रीसाठी जाताना पिकअपचा वापर केला मात्र आपल्या घरी परतताना चक्क विमानाने प्रवास केला.

यामुळे सध्या या प्रयोगशील शेतकऱ्यांची संपूर्ण जिल्ह्यात चर्चा रंगली आहे. या शेतकऱ्यांनी हौसेला काही मोल नसतं हे सिद्ध करून दाखवला आहे. जो शेतकरी जगाचा पोट भरु शकतो तो विमानाने प्रवास का करू शकत नाही हेच या प्रयोगशील शेतकऱ्यांनी दाखवून दिल आहे. 

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

जिल्ह्यातील खामकरवाडीचे राजेंद्र ईदगे व संकेत जावळे हे प्रयोगशील रेशीम उत्पादक शेतकरी म्हणून पंचक्रोशीत ओळखले जातात. या शेतकऱ्यांनी यावर्षीचे तिसऱ्या लॉट चे रेशीम कोष विकण्यासाठी रामनगर, कर्नाटक गाठले. रेशीम कोष विक्रीसाठी पिकअपने गेलेत.

रेशीम कोष विक्रीतून राजेंद्र यांना 90,000 मिळाले तर संकेत यांना दीड लाखाचं. रेशीम कोश विक्री झाल्यानंतर या दोन्ही शेतकऱ्यांनी विमानाने आपण आपलं घर गाठायचं असं ठरवलं. निश्चितच हौसेला काहीच मोल नसतं. विमानाने परतीचा प्रवास करण्यासाठी त्यांनी रामनगर ते बेंगलोर हा प्रवास एसटी बसने केला.

त्यानंतर बेंगलोरहुन विमानाने प्रवास करत पुणे शहर गाठले. परत महाराष्ट्र शासनाच्या लाल परीने पुण्याहून आपले गाव गाठले. निश्चितच, या शेतकऱ्यांनी प्रामाणिकपणे कष्ट करायचं आणि रुबाबात जगायचं हे दाखवून दिले आहे. या दोन्ही रेशीम उत्पादक शेतकऱ्यांनी शाश्वतं उत्पन्नाचा मार्ग जर शेतकऱ्यांनी अवलंबला तर त्यांना निश्चितच शेतीमधून तोटा सहन करावा लागणार नाही हे सिद्ध करून दिल आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News