अहमदनगर Live24 :- विनयभंगाची तक्रार मागे घेण्याची धमकी देत एका २७ वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.अहमदनगर शहरातील केडगाव भागात असलेला खान मळा परिसरातील ही घटना आहे.
इथे राहणारी एक २७ वर्षाची तरुणी तिच्या घरासमोर अंगणात झोपलेली असताना तिच्यावर आरोपींनी रात्री १२ च्या सुमारास पिडीत तरुणीला झोपेतून उठवून तू आमच्याविरुद्ध दिलेली विनयभंगाचा केस मागे घे, असे धमकावले, तेव्हा तरुणीने नकार दिला.
याचा राग आल्याने आरोपी कासीम उस्मान शेख याने तरुणीवर इच्छेविरुद्ध बळजबरीने बलात्कार केला.केला.व इतर आरोपींनी शिवीगाळ करुन लाथाबुक्क्याने मारहाण केली.
या भयंकर घटनेमुळे भयभीत तरुणीने घाडस दाखवत थेट कोतवाली पोलिसात जावून फिर्याद दिल्यावरुन आरोपी कासिम उस्मान शेख, मुक्तार हमीद खान, बरिसमिह्हा मुक्तार खान, बसीद खान, सर्व रा. खान मळा, लिंग रोड, केडगाव
यांच्या विरोधात भादवि कलम ३७६ (२), ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचे गांभीर्य ओळखत तातडीने घटनास्थळी डिवायएसपी संदीप मिटके पोनि विकास वाघ यांनी भेट दिली. सपोनि रणदिवे हे पुढील तपास करीत आहेत.या घटनेने नगर शहरात खळबळ उडाली आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर This Story First Publish on Ahmednagarlive24.com®