Soybean Market Update : सोयाबीन ही एक जागतिक कमोडिटी आहे. याच्या बाजारभावावर जागतिक बाजारात काय सुरू आहे याचा मोठा परिणाम होत असतो. आंतरराष्ट्रीय बाजारातील सोयाबीन दर, प्रमुख सोयाबीन उत्पादक राष्ट्रांमधील सोयाबीन उत्पादन, सोया तेलाला मिळत असलेले दर, इतर खाद्यतेलाला मिळत असलेले दर आणि मग जागतिक बाजारातील मागणी आणि पुरवठा या सर्व गोष्टींवर सोयाबीनचे दर अवलंबून असतात.
अशा परिस्थितीत आता सोयाबीन दरवाढीसाठी अनुकूल अशी स्थिती तयार होणार असल्याचे सांगितले जात आहे. तर पाहता सोयाबीन उत्पादनासाठी आघाडीचे देश म्हणजेच ब्राझील आणि अर्जेंटिना मध्ये सध्या दुष्काळी परिस्थिती पाहायला मिळत आहे.
या दोन्ही देशात विशेषता ज्या ठिकाणी सोयाबीन अधिक पिकवला जातो त्या ठिकाणी पाऊसमान कमी झाला असल्याने सोयाबीन उत्पादनात मोठी घट होणार आहे.
आतापर्यंत जाणकार लोक ब्राझील आणि अर्जेंटिनामध्ये उत्पादनात वाढ होऊ शकते असा अंदाज वर्तवत होते. मात्र आता डिसेंबर महिन्यात अर्जंटीना मध्ये खूपच कमी पाऊस झाला असल्याने सोयाबीन उत्पादनात घट होईल अशी शक्यता आहे आणि ब्राझीलमध्ये देखील अशी स्थिती बनली आहे.
यामुळे या दोन्ही देशांमध्ये कुठे ना कुठे सोयाबीन उत्पादनात घट होईल ही परिस्थिती पाहता आता बाजारात देखील वेगवेगळे समीकरण बनत असल्याचे चित्र आहे. सोयाबीन दरात उभारी येणार असल्याचे चित्र आहे. मात्र अजूनही याबाबत स्पष्टता आलेली नाही.
ज्यावेळी या दोन्ही देशांचं अंतिम उत्पादन समोर येईल त्यावेळी सोयाबीन दराबाबत योग्य तो आणि अचूक असा अंदाज बांधता येणे शक्य होणार असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. यामुळे या देशातील अंतिम सोयाबीन उत्पादनाच्या आकडेवारीकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
दुसरीकडे चायना मधून देखील थोडीशी सकारात्मक अशी न्यूज समोर येत आहे. चायनामध्ये काही ठिकाणी लॉकडाऊन शिथिल केल जात असून सोयाबीन मागणी वाढू लागली आहे. मात्र खाद्यतेलाच्या दरात होत असलेले चढ-उतार अजूनही कायमच आहे.
यामुळे सध्या देशांतर्गत सोयाबीन दरात चढ-उतार पाहायला मिळत आहे. देशांतर्गत सोयाबीन दर पाच हजार तीनशे ते पाच हजार 700 दरम्यान गेल्या काही दिवसांपासून स्थिरावले आहेत. मात्र जर दक्षिण अमेरिकेमध्ये, अर्जेंटिनामध्ये आणि ब्राझीलमध्ये सोयाबीन उत्पादनात घट आली तर निश्चितच सोयाबीन दरात वाढ होऊ शकते असं मत जाणकारांनी मांडलं आहे.