7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढीबाबत एक मोठ अपडेट हाती आल आहे. जसं की आपणास ठाऊकच आहे की सरकारी कर्मचाऱ्यांना वर्षातून दोनदा महागाई भत्ता वाढीचा लाभ दिला जातो. पहिल्यांदा जानेवारी महिन्यात आणि दुसऱ्यांदा जुलै महिन्यात ही महागाई भत्ता वाढ दिली जाते.
सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना 38 टक्के दराने महागाई भत्ता दिला जात असून जानेवारी महिन्यापासून केंद्रीय कर्मचाऱ्यांना 42 टक्के दराने महागाई भत्ताचा लाभ दिला जाणार असल्याची शक्यता होती. मात्र आता ही आशा मावळली असून केंद्रीय कर्मचाऱ्यांना केवळ 41 टक्के इतका महागाई भत्ता जानेवारी महिन्यापासून मिळणार आहे.

म्हणजेच केंद्रीय कर्मचाऱ्यांना चार टक्के महागाई भत्ता वाढ होईल अशी आशा होती मात्र आता केवळ तीन टक्केच वाढ होणार असल्याचे एका मीडिया रिपोर्ट मध्ये सांगितले गेले आहे.
खरं पाहता, महागाई भत्ता वाढ ही एआयसीपीआयच्या निर्देशांकानुसार ठरवली जात असते. अशा परिस्थितीत नुकतेच AICPI निर्देशांकाचे आकडे समोर आले आहेत ज्यामध्ये कोणतीच वाढ झालेली नाही. खरं पाहता नोव्हेंबरची AICPI ची आकडेवारी समोर आली आहे ज्यात 132.5 एवढा आकडा समोर आला आहे.
ऑक्टोबर महिन्यात देखील हीच आकडेवारी आली होती. दरम्यान आता डिसेंबर महिन्याच्या आकडेवारीनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांना किती महागाई भत्ता मिळतो हे अवलंबून राहणार आहे. आता डिसेंबर महिन्यात 133.5 हा आकडा AICPI च्या निर्देशांकात समोर आला तर महागाई भत्ता चार टक्क्याने वाढणार आहे.
परंतु जाणकार लोकांनी असं होणार नसल्याचे सांगितले आहे, म्हणजेच एआयसीपीआयच्या आकडेवारीत वाढ होण्याची शक्यता कमी आहे. यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना चार टक्के नव्हे तर तीन टक्के महागाई भत्ता वाढ जानेवारी महिन्यापासून अनुज्ञय केली जाण्याची शक्यता आहे. निश्चितच याचा केंद्रीय कर्मचाऱ्यांना फटका बसणार आहे.
महागाई भत्ता वाढीची घोषणा केव्हा होणार?
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, da वाढीची घोषणा मार्च महिन्यात होण्याची शक्यता आहे. एक मार्च रोजी केंद्रीय कॅबिनेटची बैठक होईल आणि त्यामध्ये हा निर्णय होऊ शकतो असे एका मीडिया रिपोर्ट मध्ये सांगितले गेले आहे. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे कर्मचाऱ्यांना जानेवारी महिन्यापासून हा महागाई भत्ता वाढीचा लाभ दिला जाणार आहे.
म्हणजेच जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यातील महागाई भत्ता थकबाकीची रक्कम देखील कर्मचाऱ्यांना मार्च महिन्यातील वेतनासह मिळणार आहे. एकंदरीत आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना जानेवारी महिन्यापासून 41 टक्के दराने महागाई भत्ता मिळू शकतो असे सांगितले जात आहे.
निश्चितच, 42 टक्के दराने महागाई भत्ताचा लाभ जानेवारी महिन्यापासून मिळेल अशी कर्मचाऱ्यांची आशा होती मात्र तूर्तास जाहीर झालेल्या एआयसीपीआयच्या आकडेवारीला जर आधार मानल तर कर्मचाऱ्यांची ही आशा मावळली आहे. आता कर्मचाऱ्यांना 41 टक्के दराने महागाई भत्ता मिळणार आहे.
दरम्यान, याचा महाराष्ट्रातील राज्य कर्मचाऱ्यांना देखील फटका बसणार आहे. खरं पाहता, केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धरतीवर राज्य शासनातील कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ होत असते. म्हणजेच सध्या 34 टक्के दराने राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा लाभ दिला जात असून येत्या काही दिवसात 38 टक्के दराने राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता मिळणे अपेक्षित आहे.
यानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धरतीवर राज्य कर्मचाऱ्यांना देखील 41 टक्के दरानेच महागाई भत्ता जानेवारी महिन्यापासून अनुज्ञेय केला जाईल. निश्चितच एआयसीपीआयच्या आकडेवारीतं जर डिसेंबर महिन्यात मोठा बदल झाला नाही तर सरकारी कर्मचाऱ्यांना एक मोठा फटका यामुळे बसू शकतो.