डॉक्टर्स फोनद्वारे देणार मोफत वैद्यकीय सल्ला

Ahmednagarlive24
Published:

राहाता :- कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमध्ये किरकोळ व साध्या आजारांसाठी रुग्णांना प्राथमिक पातळीवरील औषधोपचार व वैद्यकीय सल्ला त्वरित मिळावा तसेच रूग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून राहाता तालुक्यातील श्रीसाईबाबा सेवा मंडळाच्या सहा डॉक्टरांच्या टीमने पुढाकार घेतला आहे.

फोनद्वारे देण्यात येणाऱ्या मोफत वैद्यकीय सेवेचा गरजू रूग्णांनी लाभ घ्यावा,असे आवाहन श्रीसाईबाबा सेवा मंडळाच्या डॉक्टरांच्या वतीने डॉ.स्वाधिन गाडेकर यांनी केले आहे. डॉ.स्वाधिन गाडेकर म्हणाले की देशात लॉकडाऊन सुरू आहे.

या परिस्थितीत डॉक्टर व दवाखाना सहज उपलब्ध होत नाही. त्यामुळे गरुजू रुग्णांना फोनद्वारे वैद्यकीय सल्ला व प्राथमिक औषधोपचार देण्याची जबाबदारी श्रीसाईबाबा सेवा मंडळाच्या डॉक्टरांनी स्वीकारली आहे.

घरात लहान मुले, ज्येष्ठ नागरिक असतात. डोकेदुखी, पोट बिघडणे, हातपाय मुरगळणे अशा शारीरिक छोट्या तक्रारी असतील तर त्या दूर करण्यासाठी डॉक्टर मोफत सल्ला देणार आहेत.

सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत श्रीसाईबाबा सेवा मंडळाचे डॉ. स्वाधीन गाडेकर (९०४९५५१०००), डॉ. निहार जोशी, डॉ. समीर पालखे, डॉ.कुणाल दळे, डॉ. निर्मला गाडेकर, डॉ. प्रशांत गोंदकर हे सहा डॉक्टर परिसरातील रुग्णांना मोफत वैद्यकीय सल्ला देणार आहेत.

प्राथमिक उपचारांऐवजी रुग्णालयात जाऊन तपासणी व उपचार करून घेण्याची आवश्यकता असेल तर त्यास शासकीय अथवा इतर रुग्णालयात जाऊन उपचार घेण्यास सांगितले जाईल अशी माहितीही डॉ. गाडेकर यांनी दिली.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment