अहमदनगर Live24 :- नेवासे तालुक्यातील तेलकुडगाव येथील मीरा संतोष गटकळ (वय ३०) या विवाहितेने रविवारी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.
तिचा मृतदेह शवचिकित्सेसाठी औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात नेण्यात आला.
सुरुवातीला अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल केल्यानंतर या प्रकरणी माहेरच्या लोकांनी छळ व मृत्यूस कारणीभूत ठरल्याबद्दल सासरच्या लोकांविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर This Story First Publish on Ahmednagarlive24.com®