आमदार बबनराव पाचपुते म्हणाले काळजी करू नका…

Ahmednagarlive24
Published:

श्रीगोंदे :- काही ठिकाणी गेजच्या अडचणी निर्माण झाल्या. मात्र, काळजी करू नका. सर्वांचे भरणे पूर्ण होईल, असे आमदार बबनराव पाचपुते यांनी सांगितले. घोडचे आवर्तन २५ एप्रिलपासून सुरू होणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

कुकडीचे अधीक्षक अभियंता हेमंत धुमाळ, उपअभियंता दिलीप साठे, देशमुख यांच्यासमवेत पाचपुते यांनी रविवारी चारी ९ ते १४ ची पाहणी केली. ते म्हणाले, १३२ खालील काही क्षेत्र वंचित आहे.

लॉकडाऊन व गेज कमी झाल्याने सातत्य राहिले नाही. १३२ ची भर काढणे सुरू आहे. तेथे सर्वांना पाणी मिळेल. पिण्याच्या पाण्यासाठी लेंडीनाला, घोडेगाव व औटीवाडी, मोहरवाडी तलाव भरले जाणार आहेत.

घोडनदीत पाणी सोडल्याने बंधारे भरत आहेत. भीमा नदीचे पाणी संपले होते. भामाअसखेडमधून पाणी सोडले आहे. हे पाणी अजनूजपर्यंत पाणी आले आहे.

दोन दिवसांत पेडगावपर्यंत पोहचेल. नियोजनात कोठे कमी पडणार नाही. अडचणी आल्या, तर शेतकऱ्यांनी थेट आपल्याशी संपर्क करावा, असे आवाहन पाचपुते यांनी केले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment