कामावर जात नसल्याने पत्नीने केली पतीला मारहाण !

Ahmednagarlive24
Published:

चंद्रपूर : लॉकडाऊनमुळे कोरोनाच्या संसर्गावर नियंत्रण मिळविण्यात यश मिळत असले तरी लॉकडाऊनचे अनेक साइड इफेक्टही आता पुढे येत आहेत.

अशीच एक घटना पुढे आली असून, लॉकडाऊनमुळे कामासाठी न जाता घरीच बसून राहणाऱ्या पतीला पत्नीने मारहाण केली आहे.

याबाब पतीने मारहाण करणाऱ्या पत्नीविरुद्ध रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याची माहिती आहे. शनिवारी हा प्रकार उजेडात आला.

लॉकडाऊनमुळे घरातील महिलांवर अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याच्या तक्रारी येत असताना, चंद्रपुरात मात्र एका पतीलाच पत्नीने मारहाण केल्याची घटना उजेडात आली आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment