Aadhar Card : तुम्ही बनावट आधार कार्ड तर वापरत नाही ना? जाणून घ्या सोप्प्या पद्धतीने

Published on -

Aadhar Card : अनेक दिवसांपासून आधार कार्ड महत्त्वाचे केले आहे. बँक खाते चालू करणे, सिम कार्ड आणि शाळेत प्रवेश करण्यासाठी आधार आवश्यक आहे.

परंतु, तुम्हाला तुमचे आधार कार्ड बनावट आहे की खरे माहिती आहे का? कारण बनावट आधार कार्डने अनेकांची फसवणूक केली जात आहे. सोप्प्या पद्धतीने तुम्ही जाणून घेऊ शकता.

फॉलो करा या स्टेप्स 

स्टेप 1

तुमचे आधार कार्ड खोटे आहे की खरे हे जाणून घ्यायचे असेल तर तुम्हाला UIDAI च्या अधिकृत वेबसाइट https://resident.uidai.gov.in/aadhaarverification ला भेट द्यावी लागणार आहे.

स्टेप 2

  • तुमच्यासमोर आधार पडताळणीचे पेज उघडेल.
  • तेथे तुम्हाला तुमचा 12 अंकी आधार क्रमांक टाकावा लागेल.

स्टेप 3

  • आधार क्रमांक टाकल्यानंतर तुमच्या समोर स्क्रीनवर कॅप्चा कोड येईल, तो एंटर करा.
  • आता तुम्हाला verify पर्यायावर क्लिक करावे लागणार आहे.

स्टेप 4

  • यानंतर तुमचे आधार कार्ड खरे असेल तर तुमच्या समोर एक पेज उघडेल.
  • तुमचा आधार क्रमांक आहे असा संदेश स्क्रीनवर दिसेल.
  • जर तुमचे आधार कार्ड बनावट असेल तर हे पेज उघडणार नाही.
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe