Soybean Price Hike : आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन दरात केल्या काही दिवसांपासून तेजी पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे सोया पेंड दरात देखील वाढ होत आहे. मात्र देशांतर्गत सोयाबीन बाजार गेला एक महिन्यापासून स्थिर आहे. यामुळे देशातील सोयाबीन उत्पादक चिंतेत सापडले आहेत. दरम्यान आजही देशातील सोयाबीन बाजार भाव स्थिर होते.
विशेष म्हणजे सोयाबीनचे दर स्थिर असल्याने दरवाढीच्या आशेने शेतकरी बांधवांनी सोयाबीन साठवणूक करण्यास अधिक प्राधान्य दिले आहे. आज पाच लाख तीस हजार क्विंटल इतकी सोयाबीन आवक झाली. तर महाराष्ट्रात दोन लाख क्विंटल एवढी सोयाबीनची आवक झाली. म्हणजेच नेहमीच या कालावधीत होत असलेल्या सरासरी आवकेच्या तुलनेत सध्या आवक कमी होत आहे.
आवक कमी असली तरीदेखील गेल्या महिन्याभरापासून दर स्थिर आहेत. आज पाच हजार तीनशे ते पाच हजार सहाशे दरम्यान बाजार भाव मिळाला आहे. प्रक्रिया प्लांट्स मध्ये मात्र 5600 ते 5800 दरम्यान भाव मिळाला असल्याचे एका मीडिया रिपोर्ट मध्ये सांगितले गेले आहे. देशांतर्गत निश्चित सोयाबीन दर स्थिर आहेत मात्र जागतिक बाजारात सोयाबीन दरात दिवसेंदिवस वाढ होत आहे.
जागतिक बाजाराचा विचार केला असता आज दुपारी तीन वाजेपर्यंत सोयाबीनचा भाव १५ डाॅलर प्रतिबुशेल्सवर पोहचला होता. आज जागतिक बाजारात शुक्रवारच्या तुलनेत वाढ नमूद झाली आहे. त्यामुळे कुठे ना कुठे जागतिक दरवाढीचा हा परिणाम देशांतर्गत बाजारात देखील पाहायला मिळू शकतो असा दावा तज्ञ लोकांकडून केला जात आहे. निश्चितच जर तज्ञ लोकांचा हा दावा सत्यात उतरला तर दरवाढीची आशा बाळगून सोयाबीनची साठवणूक करणाऱ्या शेतकऱ्यांना यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.
खरं पाहता, गेल्या हंगामात सोयाबीन सात हजार रुपये प्रति क्विंटल ते आठ हजार रुपये प्रति क्विंटल एवढ्या विक्रमी दरात विक्री होत होता त्यामुळे या हंगामात देखील शेतकऱ्यांना असाच काहीसा दर मिळण्याची आशा होती. मात्र तूर्तास जर बाजाराचा आढावा घेतला तर शेतकऱ्यांची ही आशा फोल ठरली आहे.
विशेष म्हणजे भविष्यात देखील एवढी दरवाढ होईल की नाही याबाबत सध्या स्थितीला शाश्वती नाहीये. मात्र सध्या मिळत असलेल्या दरात थोडीशी वाढ नमूद केली जाणार असल्याचा तज्ञ लोकांचा अंदाज पाहता कुठे ना कुठे सोयाबीन उत्पादकांना दिलासा मिळणार असल्याचे चित्र आहे.