बिग ब्रेकिंग : नगर-कल्याण महामार्गावर एकाचा खून

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर – नगर – कल्याण महामार्गावरील नेप्ती फाटा येथे कुजलेल्या अवस्थेत पुरुष जातीचा मृतदेह आढळून आला. मयत व्यक्तीच्या अंगावर मारहाणीच्या जखमा आहेत. 

याबाबत सविस्तर माहिती अशी कि, नगर तालुक्‍यात नगर-कल्याण रोड परिसरात नेप्ती गावच्या शिवारात पुलाचा पाईप असून या पाईपात एका अनोळखी इसमाचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या दृष्टीने मृतदेह लपविल्याचे आढळून आले.

एका स्थानिक शेतकऱ्याच्या ही बाब निदर्शनास आली. याबाबत नगर तालुका पोलिसांना माहिती कळविण्यात आली. घटनास्थळी सहाय्यक पोलिस निरीक्षक शंकरसिंग राजपूत यांनी पथकासह जाऊन मृतदेह ताब्यात घेतला.

या घटनेने परिसरातील खळबळ उडाली असून घटनास्थळी एसपी अखिलेशकमार सिंह यांनी भेट दिली. पोना राहुल शिंदे यांच्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलिसात अज्ञात आरोपीविरुद्ध भादवि कलम ३०२, २०१९ प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला

सदर व्यक्तीचे रविवारी जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले आहे. मयत व्यक्ती नगर शहरातील असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना समजली आहे मात्र त्याचे पूर्ण नाव अजून समोर आलेले नाही.

मयत कोण? त्याचा खून का केला? कसा केला? आरोपी कोण? त्याने मृतदेह पाईपमध्ये कसा लपविला? कधी लपविला? याचा पुढील तपास सपोनि राजपूत हे करीत आहेत.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment