Cotton Rate Decline : कापूस हे भारतात उत्पादित केले जाणार एक मुख्य नगदी पीक. या पिकाच्या उत्पादनात महाराष्ट्राचा मोठा सिंहाचा वाटा आहे. राज्यातील मराठवाडा, विदर्भ, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र या विभागातील बहुतांशी जिल्ह्यात शेतकरी बांधव कपाशी पिकाची लागवड करत असतात. साहजिकच या पिकाच्या उत्पन्नावर राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे.
खरं पाहता गत हंगामात कापसाला कधी नव्हे तो विक्रमी दर मिळाला होता. कापूस गेल्या हंगामाच्या शेवटी देखील बारा हजार रुपये प्रति क्विंटलचा दरात विकला गेला. एवढेच नाही तर फरदड कापसाला देखील गतहंगामात आठ हजाराचा दर मिळाला होता. अशा परिस्थितीत यंदा कापूस लागवडीखालील क्षेत्रात वाढ होणारच होती. झालं देखील तसंच यंदा कापसाच्या लागवडीखालील क्षेत्रात मोठी वाढ नमूद करण्यात आली आहे.
खरं पाहता गत हंगामा प्रमाणेच कापसाला विक्रमी दर मिळेल आणि पदरी चार पैसे अधिक शिल्लक राहतील अशी शेतकऱ्यांची आशा होती. नवीन हंगाम सुरू झाल्यानंतर शेतकऱ्यांची ही आशा कुठे ना कुठे सत्यात उतरेल असं चित्र देखील तयार झालं होतं. कारण की नवीन हंगामाच्या सुरुवातीला म्हणजे मुहूर्ताच्या कापसाला कापूस पंढरी खानदेशात 14 हजार रुपये प्रति क्विंटलचा दर मिळाला तर इकडे मराठवाड्यात 11,000 रुपये प्रतिक्विंटरपर्यंतचा बाजारभाव नमूद झाला.
सुरुवातीलाच असा विक्रमी दर मिळाला असल्याने यंदाचा हंगाम कापूस उत्पादकांना मालामाल बनवेल अशा बातम्या मीडियामध्ये देखील वेगाने झळकत होत्या. परंतु हे विक्रमी दर अवघ्या काही घटकांचे जोडीदार राहिले आणि बाजारात कापसाची आवक वाढल्याबरोबरच दरात मोठी पडझड झाली. मध्यंतरी कापूस दर 9000 रुपये प्रति क्विंटलच्या सरासरी भाव पातळीवर येऊन थांबलेत.
पण खरी अनहोनी झाली ती डिसेंबर 2022च्या शेवटी. डिसेंबर महिन्याच्या शेवटी कापूस साडेसात हजार रुपय प्रतिक्विंटलपर्यंत खाली आला. यामुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चुरडा मुरडा झाला. दरम्यान नववर्षाच्या सुरुवातीला पुन्हा एकदा कापूस दरात उभारी पाहायला मिळाली. पुन्हा एकदा दर 9000वर आलेत.
पण आता गेल्या चार-पाच दिवसांपासून दरात घसरगुंडी पाहायला मिळत आहे. सध्या स्थितीला कापूस दर 7000 रुपये प्रति क्विंटल ते आठ हजार रुपये प्रति क्विंटल दरम्यान पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी साडेआठ हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा दर नमूद केला जात आहे. आज अकोला जिल्ह्यातील काही एपीएमसी मध्ये 9000 रुपये प्रति क्विंटलचा कमाल दर देखील नमूद करण्यात आला.
परंतु सरासरी दर साडेआठ हजार रुपये प्रति क्विंटलपेक्षा कमीच आहेत. अशा परिस्थितीत कापूस पिकासाठी झालेला उत्पादन खर्च वसूल करणे देखील शेतकऱ्यांपुढे मोठे आव्हानात्मक बनले आहे. कापूस दरात होत असणारी घसरणीबाबत तज्ञांनी मात्र चीनशी कनेक्शन जोडल आहे. तज्ञांच्या मते चीन हा एक प्रमुख कापसाचा ग्राहक आहे.
अशातच चीनमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढले असल्याने त्या ठिकाणी केंद्र सरकारने भारतीय कापसाची निर्यात थांबवली आहे. यामुळे भारतातुन होणाऱ्या कापूस निर्यातीवर परिणाम झाला असून देशांतर्गत कापूस दरात घसरण होत आहे. गेल्या 15 ते 20 दिवसांचा विचार जर केला तर कापूस दरात जवळपास दीड हजारापर्यंतची घसरण झाली आहे.
चीनमध्ये निर्यात थांबवली असल्याने बड्या व्यापाऱ्यांकडचा कापूस त्यांच्याकडेच पडून आहे. या परिस्थितीचा धसका हा लहान व्यापाऱ्यांना देखील बसला त्यांनी देखील आता कापूस खरेदी कमी केली आहे. एकंदरीत चायना मधील कोरोना कुठे ना कुठे भारतीय शेतकऱ्यांच्या मुळावर उठला आहे, चीनमध्ये कोरोना रुग्ण संख्या वाढली असल्याने त्या ठिकाणी निर्यात थांबवली गेली असल्याने कापूस दरात घसरण होत आहे.