ST Bus Employee : ब्रेकिंग ! शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय ; एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी 300 कोटींचा निधी वितरित, आज होणार का पगार?

Ajay Patil
Published:

ST Bus Employee : महाराष्ट्र राज्य शासनातील एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी एक दिलासादायक अशी बातमी समोर आली आहे. खरं पाहता एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांचे वेतन सात ते दहा तारखेच्या दरम्यान होत असते. पण डिसेंबर महिन्यातील वेतन देयक जे की जानेवारी महिन्यातील 7-10 दरम्यान कर्मचाऱ्यांना मिळणार होतं.

आज 13 जानेवारी होऊनही कर्मचाऱ्यांना मिळालेलं नाही. यामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये शासनाविरोधात मोठा रोष पाहायला मिळत आहे. दरम्यान आता जानेवारी महिन्यातील वेतनासंदर्भात एक मोठी माहिती हाती आली आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांचे आजच वेतन केल जाणार आहे.

राज्यातील 90 हजार एसटी कर्मचाऱ्यांचे आज वेतन करण्यासाठी राज्य शासनाकडून 300 कोटींचा निधी वितरित झाल्याची माहिती एका मीडिया रिपोर्ट मधून समोर आली आहे. निश्चितच मकर संक्रांतीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांचे जे रखडलेले वेतन होते ते आज मिळणार असल्याने एसटी कर्मचाऱ्यांची संक्रांत गोड होणार आहे.

खरं पाहता 2022 मध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी सहा महिने वेतन वेळेवर मिळत नसल्याने तसेच एसटी महामंडळ शासनात विलीन करावे या आपल्या प्रमुख मागण्यांसोबत संप पुकारला होता. विशेष म्हणजे आत्ताच्या सरकारमधील मंत्री त्यावेळी एसटी कर्मचाऱ्यांच्या बाजूने उभे होते.

मात्र आता शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आल्यानंतरही एसटी कर्मचाऱ्यांना वेळेवर मिळत नसल्याचे चित्र आहे. दरम्यान संपाच्या काळात शासनाकडून एसटी कर्मचाऱ्यांना सात ते दहा तारखे दरम्यान वेतन करण्यासाठी शासनाकडून अनुदान पुरवले जाईल अशी ग्वाही देण्यात आली होती.

पण तूर्तास शासनाकडून वचनाची पूर्ती होत नसल्याचे चित्र आहे. यामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये शासनाविरुद्ध रोष वाढला आहे. कर्मचाऱ्यांनी आपली नाराजी उघड व्यक्त देखील केली आहे. दरम्यान आज एसटी कर्मचाऱ्यांना वेतन मिळणार असल्याने संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर ही एक मोठी दिलासादायक अशी बातमी त्यांच्यासाठी आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe