Soybean Rate : सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांसाठी मकर संक्रांतीच्या या पूर्वसंध्येला थोडीशी चिंताजनक बातमी समोर येत आहे. सोयाबीन दरात आज वरोरा माढेली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठी घसरण नमूद करण्यात आली आहे. 5200 रुपये प्रतिक्विंटलच्या आसपास स्थिरावलेले सोयाबीनचे सरासरी दर आता या मार्केटमध्ये कमी झाले आहेत.
आज झालेल्या लिलावात या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला 4875 रुपये प्रति क्विंटल एवढा सरासरी बाजार भाव मिळाला आहे. निश्चितचं गेल्या दोन महिन्यांपासून पाच हजार दोनशे ते पाच हजार चारशे रुपये प्रतिक्विंटल पर्यंत जो सरासरी दर मिळत होता तो देखील आता कमी झाला असल्याने सोयाबीन उत्पादक आर्थिक कोंडीत सापडत असल्याचे चित्र आहे.

खरं पाहता, या हंगामात निसर्गाच्या लहरीपणामुळे सोयाबीन उत्पादित करण्यासाठी शेतकऱ्यांना अधिकचा खर्च करावा लागला आहे. शेतकऱ्यांच्या मते, त्यांना सोयाबीन उत्पादित करण्यासाठी जवळपास 5200 प्रतिक्विंटल एवढा खर्च आला आहे. अशा परिस्थितीत सध्या त्याहीपेक्षा जर कमी दर मिळत असेल तर सोयाबीन उत्पादक शेतकरी कर्जबाजारी होईल असे मत शेतकऱ्यांकडून व्यक्त केले जात आहे.
यामुळे सध्या स्थितीला बहुतांशी शेतकऱ्यांनी केवळ गरजेपुरता सोयाबीन विक्री करण्याचे ठरवले असून दरवाढीच्या अनुषंगाने सोयाबीनची साठवणूक राज्यात सुरू झाली आहे. दरम्यान आज आपण राज्यातील प्रमुख बाजारात झालेल्या सोयाबीन लिलावाची थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 1455 क्विंटल लोकल सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये सोयाबीनला 4700 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5408 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 5231 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
लासलगाव- निफाड कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 341 क्विंटल पांढरा सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये सोयाबीनला 3001 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5521 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 5490 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 4637 क्विंटल पिवळा सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये सोयाबीनला 5000 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5475 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 5300 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
वाशिम कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 4500 क्विंटल पिवळा सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये सोयाबीनला 4750 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5800 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 5200 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
वरोरा कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 211 क्विंटल पिवळा सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये सोयाबीनला 5005 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5350 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 5250 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
वाशिम- अनसिंग कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 600 क्विंटल पिवळा सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये सोयाबीनला 5050 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5475 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 5100 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
वरोरा- माढेली कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 215 क्विंटल पिवळा सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये सोयाबीनला 4600 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5200 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 4875 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
निलंगा कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 250 क्विंटल पिवळा सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये सोयाबीनला 5000 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5415 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 5300 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
उमरखेड कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 220 क्विंटल पिवळा सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये सोयाबीनला 5000 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5300 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 5150 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
बाभुळगाव कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 675 क्विंटल पिवळा सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये सोयाबीनला 5000 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5555 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 5300 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
उमरखेड- डांकी कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 170 क्विंटल पिवळा सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये सोयाबीनला 5000 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5300 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 5150 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
राजुरा कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 392 क्विंटल पिवळा सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये सोयाबीनला 4900 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5420 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 5255 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
सिंदी- सेलू कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 1153 क्विंटल पिवळा सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये सोयाबीनला 5200 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5350 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 5300 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.
सोनपेठ कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज या मार्केटमध्ये 81 क्विंटल पिवळा सोयाबीन आवक झाली. आज झालेल्या लिलावात या मार्केटमध्ये सोयाबीनला 5224 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान दर मिळाला असून 5401 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल दर मिळाला आहे. तसेच सरासरी दर 5307 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.