अहमदनगर Live24 :- सरपंच पदापासून राज्याच्या मंत्रीपदापर्यंत लोकसंपर्काच्या माध्यमातून वाटचाल केलेले नेतृत्व ही माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांची ओळख आहे. तीस वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत सत्ता असो वा नसो, सामान्य जनतेच्या सोबत प्रसंगात माजी मंत्री कर्डिले यांनी नेहमीच आघाडीवर राहून जनतेचे प्रश्न मार्गी लावले.
जनतेसाठी अहोरात्र उपलब्ध असणारे माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी लॉकडाऊनच्या काळातही सामान्य जनतेच्या मदतीसाठी सरसावले आहेत. रोजगार बुडाल्याने अनेक कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. या परिस्थितीत कर्डिले यांनी राहुरी तालुक्यातील ६८ गावांतील गरजू कुटुंबांना किराणा मालाचे आजपासूनच वितरणास सुरुवात करण्यात येणार आहे.
सत्ता नसली तरी नेतृत्वाची जबाबदारी ठामपणे पार पाडण्यात माजी मंत्री कर्डिले आघाडीवर असतात. कोरोना संसर्गजन्य विषाणूवर मात करण्यासाठी देशामध्ये लॉकडाऊन ३ मे पर्यंत जाहीर करण्यात आले आहे. हे
लॉकडाऊन लक्षात घेऊन माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले पुढील १0 दिवस गरजूवंतांना सुमारे चार हजार कुटुंबांना घरपोच किराणा देणार आहेत. शासन व प्रशानाच्या नियमांचे प्रत्येकांनी अंमलबजावणी करावी.
माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले म्हणाले की, कोरोना संसर्गजन्य विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे दोन वेळेस लॉकडाऊन करण्यात आले. या विषाणूचा प्रादुर्भाव ग्रामीण भागातही वाढत असल्याने हातावर पोट भरणाऱ्यांची संख्या गावात मोठ्या प्रमाणात आहे.
शेतीतील कामे बंद असल्यामुळे हातावर कामगार करणाऱ्यांवर उपासमारीची वेळ येऊ नये व कोणीही घराबाहेर पडू नये, शासनाच्या नियमांचे उल्लंघन होऊ नये,
यासाठी राहुरी तालुक्यातील ६८ गावातील गरजवंत नागरिकांना घरपोच किराणा मालाचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच पाथर्डी तालुक्यातील ३९ गावे व नगर तालुक्यातील २४ गावांत रेशन दुकानावर मिळणाऱ्या धान्याच्या बीलाची रक्कम सरसकट भरण्यात आली आहे. हे धान्यही लवकरच मिळणार असल्याचे ते म्हणाले.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर