ठाणे-बोरिवली भूमिगत मार्ग : 11.8 किमीचा मार्ग, 10.25 किमीचे 2 बोगदे, 11,235.43 कोटी रुपयांचा होणार खर्च, ‘इतके’ दिवस चालणार काम ; पहा रोडमॅप

Thane Borivali Underpass : सध्या मुंबई व मुंबईच्या महानगरात रस्ते विकासाची कामे जोमात सुरू आहेत. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांच्या माध्यमातून मुंबईमध्ये वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महत्त्वपूर्ण अशा प्रकल्पांची कामे केली जात आहेत. यामध्ये मेट्रो, मोनो, सागरी सेतू, सागरी मार्ग यांसारख्या प्रकल्पाचा समावेश आहे.

दरम्यान आता भुयारी मार्ग देखील उपस्थित केला जात आहे. एम एम आर डी ए च्या माध्यमातून म्हणजेच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून ऑरेंज गेट ते नरिमन पॉईंट असा एक भुयारी मार्ग तयार होणार असून ठाणे ते बोरिवली हा भुयारी मार्ग देखील एमएमआरडीएने हाती घेतला आहे. दरम्यान आज आपण ठाणे ते बोरिवली या भुयारी मार्गाबाबत सविस्तर जाणून घेण्याचा थोडक्यात प्रयत्न करणार आहोत.

खरं पाहता, ठाण्याहून बोरिवली ला जाण्यासाठी सद्यस्थितीला दीड ते दोन तासांचा कालावधी लागतो. जर वाहतूक कोंडी असली तर दोन तास देखील लागतात. अशा परिस्थितीत  ठाणे बोरिवली दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना जो काही वाहतूक कोंडीचा फटका बसतो यातून बाहेर काढण्यासाठी तसेच सुरक्षित वाहतूक प्रदान करण्यासाठी बोरिवली ते ठाणे भूमिगत मार्गाचे काम हाती घेण्यात आले आहे. वास्तविक हा मार्ग सर्वप्रथम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे होता. मात्र 2021 मध्ये शासनाने भूमिगत रस्त्याचे काम एमएमआरडीएकडे सुपूर्द केले आहे.

ठाणे बोरिवली भूमिगत मार्गाबाबत थोडक्यात 

हा मुंबई आणि ठाणेकरांसाठी अति महत्त्वाचा असा भूमिगत मार्ग ११.८ किमी लांबीचा राहणार आहे. या भूमिगत मार्गात १०.२५ किमी लांबीचे दोन बोगदे तयार केले जाणार आहेत. हे दोन्ही बोगदे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणार आहेत. हा भूमिगत मार्ग सहा मार्गिकेचा म्हणजे येण्यासाठी तीन अन जाण्यासाठी तीन असा राहणार आहे. या प्रकल्पासाठी ११,२३५.४३ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

हा भुयारी मार्ग तयार करण्यासाठी टीबीएम (टनेल बोअरिंग मशीन) यंत्राचा वापर करण्यात येणार आहे. हा मार्ग तयार झाल्यानंतर अवघ्या 20 मिनिटात ठाणे ते बोरिवली हा प्रवास करता येणार आहे.आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, 2021 मध्ये राज्य रस्ते विकास महामंडळाकडून हाती घेतलेला हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी एमएमआरडीएने कंबर कसली आहे. एमएमआरडीच्या हाती प्रकल्प आल्यानंतर या प्रकल्पाच्या आराखड्यात काही मूलभूत बदल केले गेलेत.

हा सुधारित आराखडा आता मंजूर झाला आहे. त्यानुसार आता बांधकामासाठी निविदा देखील जारी झाली आहे. निश्चितच निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पावसाळ्यात या मार्गिकेच्या कामाला सुरुवात होणार आहे. एकंदरीत पुढील पाच वर्षांनी हा प्रोजेक्ट मार्गी लागणार आहे म्हणजेच वाहतुकीसाठी खुला होणार आहे.