अहमदनगर ब्रेकिंग : वहिनीसोबत असलेल्या अनैतिक संबंधात अडसर ठरल्याने सख्ख्या भावाची हत्या, पोलिसांवरही केला कुऱ्हाडीने हल्ला !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 :-  वहिनीसोबत असलेल्या अनैतिक संबंधात अडसर ठरत असलेल्या सख्ख्या भावाचा काटा काढण्यासाठी एका भावाने त्याच्या सख्ख्या भावाची निर्घृणपणे हत्या केल्याचा प्रकार पोलिसांनी उघड केला.

पैठण शहरात रविवारी स्कूल बसचालकाचा धारदार शस्राने गळा चिरून खून झाल्याचे उघड झाले होते. स्थानिक गुन्हे अन्वेषण व पैठण पोलिसांनी २४ तासांच्या आत या खुनाचा छडा लावून आरोपीस बेड्या ठोकल्या आहेत.

गोरख लोखंडे असे त्या आरोपीचे नाव असून त्याचे त्याच्या पैठण येथे राहणाऱ्या शिवा विठ्ठल लोखंडे या भावाच्या बायकोसोबत अनैतिक संबंध होते.शिवाजी विठ्ठल लोखंडे असे या मयत भावाचे नाव आहे.

 दि. 19 एप्रिल रोजी रोजी लोखंडे याच्या बंद घरातून दुर्गंधी येत असल्याने रहिवाशांनी पोलिसांना माहिती दिली.कुलूप तोडून पाहणी केली असता घरात शिवा लोखंडे हा मृतावस्थेत दिसून आला.

त्याच्या गळ्यावर तीक्ष्ण हत्याराने वार केलेले होते. अधिक तपास केल्यानंतर पोलिसांनी अवघ्या24 तासात मयताचा सख्खा धाकटा भाऊ गोरख लोखंडे यास दि. 20 एप्रिल रोजी राहता (जिल्हा, नगर) येथील घरातून अटक केली.

या प्रकरणी आरोपीला अटक करायला गेलेल्या दोन पोलिसांवर देखील त्याने कुऱ्हाडीचे वार केले आहेत. या हल्ल्यात फौजदार संतोष माने व मधुकर मोरे हे जखमी झाले आहेत. आरोपीने नगर जिल्ह्यातील राहता येथे पोलिसांवर हल्ला केला. 

वहिनीसोबत अनैतिक संबंध असल्याने अडथळा नको म्हणून भावाला कुऱ्हाडीने संपवल्याची कबुली आरोपीने दिली. शुक्रवारी 17 एप्रिल रोजी हत्या करून गोरख परत राहता येथे निघून गेला. व खुनासाठी वापरलेली कुऱ्हाड तेथेच लपवून ठेवली होती.

तपास अधिकारी असलेले पोलीस ऊपनिरीक्षक संतोष माने, मधुकर मोरे हे पथकासह गोरखला घईन हत्यार लपवलेली जागा बघायला गेले असता गोरखने लपवलेली कुऱ्हाड बाहेर काढूनकाही समजायच्या आतच फौजदार संतोष मानेंवर हल्ला केला.

गळ्यावर येणारा वार मोठ्या शिताफीने त्यांनी ऊजव्या हातावर झेलला. यात माने यांच्या मनगटासह पंज्याला गंभीर जखमा झाल्या. दुसरे फौजदार मधुकर मोरे यांनाही दुखापत झाली. अन्य उपस्थित पोलिस पथकाने तत्काळ हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. 

याप्रकरणी पोउनि संतोष महादेव माने यांच्या फिर्यादीवरून आरोपी गोरख विठ्ठल लोखंडे, याच्याविरुद्ध राहाता पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment