कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी चिमुकलीने दिली आपली पिगी बँक

Ahmednagarlive24
Published:

चंद्रपूर, दि. 21 : देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. कोरोना विषाणूच्या या संकटावर मात करण्यासाठी प्रत्येक जण आपापल्या परीने गरजू लोकांना मदत करण्याचा प्रयत्न करीत असून या संकटावर मात करण्यासाठी आवश्यक निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-19 या माध्यमातून जमा केला जात आहे.

तिसऱ्या वर्गातील तनिष्का शर्माने आपली पिगी बँक देऊन कोरोना विरुध्दच्या लढ्यासाठी जिल्हा सहाय्यता निधीत योगदान दिले. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी मदत निधीचे जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या आवाहनास उत्तम प्रतिसाद मिळत असून या आवाहनास प्रतिसाद देत अनेक संस्था,व्यक्ती यांनी जिल्हा सहायता निधीच्या खात्यात देणग्या देणे सुरू केले आहे.

आज प्रामुख्याने जुबली फाउंडेशन चंद्रपूर (1994 बॅच) रेवती बडकेलवार,आरती श्रावणी व संतोष तेलंग यांच्या हस्ते रु.21 हजार,डॉ.बाबासाहेब आंबेडकर विद्युत कर्मचारी सह. पतसंस्था ऊर्जानगरच्या वतीने रु.20 हजार, जिल्हा परिषद शिक्षण कर्मचारी सह.पतसंस्था गडचांदूर, जय भारत मजूर सह.संस्था विसापूर, प्रतिकार नागरी सह. पतसंस्था जुनासुर्ला, सेवा सहकारी संस्था चार्ली,ममता नागरी सह. पतसंस्था चंद्रपूरच्या वतीने प्रत्येकी रु.11 हजार, अजय मेकलवार चंद्रपुर यांच्याकडून रु.31 हजार, चंद्रपूर नागरी सह.

पतसंस्था चंद्रपूरच्या वतीने रु.15 हजार तर सौरभ ट्रेडर्स चंद्रपूर यांचेकडून रु.21 हजाराचा धनादेश जिल्हा सहायता निधीस देण्यात आला. त्यासोबतच मुख्यमंत्री सहायता निधी कोविड-19 या स्वतंत्र बँक खात्यामध्ये राजीव गांधी कॉलेज ऑफ इंजिनियरिंग रिसर्च टेक्नॉलॉजी चंद्रपूरच्या वतीने रु.1 लक्ष 50 हजार सहायता निधी देण्यात आला.

मदतीसाठी या बँक खात्यात निधी जमा करा कलेक्टर चंद्रपूर कोव्हिड-19 या नावाने जिल्ह्यातील अग्रणी बँक ऑफ इंडियामध्ये ‍ स्वतंत्र खाते उघडण्यात आले असून खाते क्रमांक 960310210000048 असून यासाठी आयएफएससी कोड BKIDOOO9603 असा आहे. जिल्ह्यातील उद्योजक, कंपन्यांचे प्रमुख, स्वंयसेवी संस्था,धार्मिक संस्था राज्य शासनाच्या बरोबरीने या युद्धात सहभागी होऊन मदत करू इच्छितात त्या सर्व संस्था आणि नागरिकांनी सढळ हाताने मदतीची रक्कम जमा करावी असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी केले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment