Vastu Tips : वैवाहिक जीवन सुखी आणि समृद्ध करण्यासाठी अनेकजण प्रयत्न करत असतात. मात्र पती पत्नीमधील भांडणे अनेकदा टोकाला जात असतात. पती आणि पत्नीमधील भांडणे ही सामान्य गोष्ट आहे. मात्र सतत भांडण्याने नात्यात कटुता निर्माण होत असते.
काही वेळा पती पत्नीमधील भाडंण अगदी शेवटच्या टोकापर्यंत पोहोचते. हाणामारी आणि घटस्फोटापर्यंत पती आणि पत्नी काही वेळा पोहोचत असतात. भांडणामुळे अनेकदा पती आणि पत्नी एकमेकांपासून दुरावतात.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2023/01/ahmednagarlive24-Vastu-Tips.jpg)
काही वेळा किरकोळ वास्तुदोषामुळे पती पत्नीमध्ये भांडण होत असतात. बेडरूमची वास्तू दुरुस्त केल्याने तुमच्या वैवाहिक जीवनात सुख येईल. तसेच नात्यात गोडवा निर्माण होईल.
ज्योतिषशास्त्रानुसार, वास्तुशास्त्रामध्ये विशिष्ट ठिकाणची ऊर्जा नियंत्रित करून वापरली जाते. अशा प्रकारे नियंत्रित उर्जा जोडप्यांमधील तुमची दुरावा दूर करते आणि प्रेम वाढवते. वास्तुच्या अशा काही उपायांबद्दल जाणून घ्या, ज्यामुळे तुमचे वैवाहिक जीवन सुखी होईल. हे उपाय करणे खूप सोपे आहे आणि ते पूर्ण होताच झटपट प्रभाव दाखवू लागतात.
वास्तूचे हे उपाय विवाहित जोडप्यांमध्ये प्रेम वाढवतील
नवविवाहित जोडपे अनेकदा पलंगावर एकत्रित वेळ घालवत असतात. बेडवर कधीही काळी, निळी किंवा गडद रंगाची बेडशीट टाकू नये. यामुळे प्रेमात तणाव निर्माण होऊ शकतो. गुलाबी किंवा पिवळ्या रंगाची बेडशीट वापरावी.
बेडरूमच्या भिंतींवर हलके किंवा पेस्टल रंग वापरा. बेडरूममधील भिंतीवर कधीही गडद निळा, तपकिरी किंवा इतर अशा रंगांचा वापर करू नका. यामुळे पती पत्नीमध्ये तणाव निर्माण होऊ शकतो.
बेडरूममध्ये देवी-देवतांचे फोटो लावू नका. तसेच, शिकार किंवा युद्धाच्या दृश्यांची छायाचित्रे खोलीत लावू नयेत. असे केल्याने प्रेमसंबंधांमध्ये तणाव निर्माण होतो. ज्योतिषशास्त्रानुसार रोमँटिक चित्रे, हसरे चेहरे किंवा नैसर्गिक दृश्यांशी संबंधित चित्र बेडरूममध्ये लावावे. यामुळे पती-पत्नीमधील प्रेम वाढते आणि त्यांच्यातील सर्व दुरावा कायमचा दूर होतो.