Heart Attack In Winters : जगभरात दरवर्षी कोट्यवधी लोकांना हृदयविकाराचा झटका येत असतो. काहींचा मृत्यू होतो तर काहींना आयुष्यभर हृदयाचा त्रास सुरु होतो. हृदयविकाराचा झटका हा रक्तदाब वाढल्याने येत असतो. रक्तदाब वाढल्याने रक्तवाहिन्या ब्लॉकेज होत असतात.
देशात सध्या थंडीचे दिवस सुरु आहे. थंडीच्या दिवसांत अनेकांना हृदयाशी संबंधित त्रास सुरु होतात. अशा दिवसांत शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण वाढते. याचा परिणाम शरीरातील रक्तदाबावर होत असतो.
शरीरामध्ये कोरोनरी धमन्या असतात. या गुळगुळीत स्नायूंनी बनलेल्या असतात. थंडीच्या दिवसांत अशा रक्तवाहिन्यांवर अधिक परिणाम होत असतो. यामुळे शरीरातील रक्तपुरवठा सुरळीत राहत नाही आणि छातीत दुखू लागते.
थंडीच्या दिवसांत रक्तवाहिन्या आकुंचित होऊ लागतात, त्यामुळे शरीराच्या सर्व अवयवांपर्यंत रक्त पोहोचण्यात अडचणी येतात, अशा स्थितीत उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवू शकते. साधारणपणे या ऋतूत वृद्धांना हृदयविकाराचा धोका अधिक असतो.
थंडीच्या दिवसांत दिवस लहान आणि रात्र मोठी असते. यामुळे शरीरातील हार्मोनल असंतुलन होत असते. त्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढण्याचा धोका अधिक निर्माण होतो.
हिवाळ्यात आपण पूर्वीसारखेच अन्न खातो किंवा त्याचे प्रमाण थोडे वाढवतो, परंतु जास्त वेळ घरात राहिल्यामुळे हिवाळ्यात आपली शारीरिक क्रिया कमी होते, त्यामुळे वाईट कोलेस्ट्रॉल वाढते आणि हृदयविकार होण्याची भीती असते.
त्यामुळे थंडीच्या दिवसांत उबदार कपडे घालावीत. हृदयाचा आजार असलेल्या लोकांनी शरीराचे तापमान व्यवस्थित ठेवावे. ज्याने शरीराला थंडी कमी लागेल आणि हार्ट अटॅकचा धोका कमी होईल. तसेच व्यायाम करत राहावा. जाड वस्तू उचलू नये. स्वतःला दम लागेल असे कोणतेही कृत्ये करू नये.