पेट्रोल व बॅटरीवर चालणारी नवीन इनोव्हा हायक्रॉस अहमदनगर शहरात लॉन्च ! Toyota Innova Hycross 2023

Ahmednagarlive24
Published:

Toyota Innova Hycross 2023 :- पेट्रोल व बॅटरीवर चालणार्‍या नवीन इनोव्हा हायक्रॉसचे अनावरण केडगाव एमआयडीसी येथील वासन टोयोटा शोरुममध्ये माजी मंत्री शिवाजी कर्डिले, आमदार अरुणकाका जगताप व आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते पार पडले. यावेळी नवीन इनोव्हा हायक्रॉस हे वाहन पाहण्यासाठी कारप्रेमी ग्राहकांनी मोठी गर्दी केली होती.

अनावरण कार्यक्रमाप्रसंगी उपमहापौर गणेश भोसले, विनायक देशमुख, अक्षय कर्डिले, उद्योजक इंद्रजीत नय्यर, रविंद्र बक्षी, हरजितसिंह वधवा, नगरसेवक विनीत पाऊलबुध्दे, अमोल गाडे, प्रकाश भागानगरे, समद खान, बाळासाहेब पवार, बाबा खान, फारुक शेख, सुनिल त्र्यंबके, मनपाचे परिमल निकम, अ‍ॅड. ललित गुंदेचा अनिकेत गुंदेचा, प्रितपालसिंह धुप्पड, राजेंद्र कंत्रोड, सतीश गंभीर, कैलाश नवलानी,

अनिल अ‍ॅबट, डॉ. अनिल आठरे, अर्जुन मदान, अ‍ॅड. जयंत भापकर, अशोक बलदोटा, जवाहर मुथा, डॉ. अनिल आठरे, हेमचंद्र इंगळे, शाम रेणाविकर, डॉ. विजयकुमार सोनार, प्रभाकर बोरकर, नितीन गुगळे, दलजितसिंह वधवा, लकी खुबचंदानी, दिनेश छाबरीया, मोहित पंजाबी, सीए अजय गांधी, वासन टोयोटाचे जनक आहुजा, जतीन आहुजा, अनिश आहुजा, सेल्स मॅनेजर दिपक जोशी, प्रविण जोशी, रविंद्र थोरात आदी सेल्स टीमचे प्रतिनिधी उपस्थित होते.

माजी मंत्री शिवाजी कर्डिले म्हणाले की, पूर्वीच्या वाहनामध्ये मोठ्या प्रमाणात बदल होऊन, अद्यावत तंत्रज्ञानयुक्त वाहन बाजारात येत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून जास्तीत जास्त गाड्या बॅटरीवर कशा आणता येतील?

या दृष्टीने कार उत्पादन सुरू आहेत. बॅटरीवरील वाहने काळाची गरज बनली आहे. टोयोटाची नवीन इनोव्हा हायक्रॉस हे वाहन उत्तम असून, मायलेज देखील सर्वांसाठी लाभदायी ठरणारा आहे. कमी खर्चात नागरिक प्रवास करु शकणार आहेत. तर इंधन बचत होऊन प्रदूषण कमी होण्यास मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आमदार अरुणकाका जगताप यांनी इनोव्हा हायक्रॉसचे अद्यावत तंत्रज्ञान व आकर्षक लुक ग्राहकांच्या पसंतीस उतरणार असल्याचे सांगितले. आमदार संग्राम जगताप यांनी दिवसेंदिवस इंधनमध्ये दर वाढ होत आहे.

अशा परिस्थितीमध्ये बेटरीवरील वाहन नागरिकांपुढे चांगला पर्याय म्हणून आले आहेत. चार चाकी वाहन देखील हायब्रीड होत असून, इंधन व खर्च वाचणार असल्याचे त्यांनी सांगितले. पाहुण्यांचे स्वागत जनक आहुजा यांनी केले. आभार अनिश आहुजा यांनी मानले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe