पाथर्डी : करंजी परिसरातील एका खेड्यात साठ वर्षे वयाच्या महिलेचा एका तीस वर्षे वयाच्या युवकाने विनयभंग केल्याची घटना मंगळवारी (दि.२१) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली.
महिलेने आरडाओरड केल्यानंतर ग्रामस्थ जमा झाले. जमलेल्या ग्रामस्थांनाही युवकाने शिवीगाळ केली असून याबाबतवृद्ध महिलेने तक्रार दाखल केली आहे.
पोलिसांनी त्या युवकाला ताब्यात घेतले आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, करंजीजवळील एका खेड्यामधे साठ वर्षे वयाची वृद्ध महिला नातवासोबत घरात गप्पा मारत होती.
त्यावेळी संदीप दत्तु शिंदे हा युवक तेथे आला व घरात येवुन त्याने वृद्धेची छेड काढण्यास सुरु केली. तसेच तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. महिलेने आरडाओरड केल्यानंतर शेजारचे लोक धावले.
यावेळी जमा झालेल्या गावातील लोकांनाही शिंदे याने शिवीगाळ केली. याप्रकरणी महिलेने पाथर्डी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी संदीप शिंदे याला ताब्यात घेतले आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर This Story First Publish on Ahmednagarlive24.com®