अहमदनगर Live24 :- नगर – औंरगाबाद महामार्गावरील शेंडी बायपास चौकात कंटनेरने पोलीस कर्मचाऱ्याला उडविल्याची घटना आज सकाळी घडली.
वाहतूक शाखेचे कर्मचारी नदीम शेख हे यात गंभीर जखमी झाले आहे.पोलीस कर्मचारी नदीम शेख यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
बायपास येथे वाहने सोडण्यासाठी बॅरिकेडिंग करण्यात आलं आहे. त्या ठिकाणी पोलीस मुख्यालयातील कर्मचारी नेमण्यात आले आहेत. आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास एक डंपर भरधाव आला.
डंपरने बॅरिकेडिंग उडवून दिले. त्यात शेख यांना वाहनाची धडक बसून ते गंभीर जखमी झाले..कंटनेर ही अपघातानंतर पलटी झाला. एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
कंटेनर पलटी झाल्याने या परिसरात काही काळ गोंधळ उडाला. लॉकडाऊन असल्याने रस्त्यावर वाहतूक नव्हती. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली नाही.
शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी वरिष्ठांनी रुग्णालयात धाव घेतली.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर This Story First Publish on Ahmednagarlive24.com®