Space News : काय सांगता! चंद्रावर खेळला गेला होता हा खेळ, अंतराळवीराने लपवून नेले होते खेळाचे सामान; पहा व्हिडीओ…

Ahilyanagarlive24 office
Published:

Space News : गेल्या काही वर्षांपूर्वी चंद्रावर जाण्याचे मानवाचे स्वप्न पूर्ण झाले होते. अमेरिकन स्पेस एजन्सी नासाची चंद्र मोहीम यशस्वी ठरली होती. मात्र या मोहिमेवर गेलेल्या एका अंतराळवीराने चक्क चंद्रावर एक खेळ खेळला होता. त्याची माहिती चक्क नासाला देखील नव्हती.

अपोलो-14 ही नासाची चंद्र मोहीम होती. 51 वर्षांपूर्वी चंद्राच्या पृष्ठभागाला स्पर्श करण्यात मानव यशस्वी ठरला होता. अपोलो-14 ही नासाची पहिली मोहीम यशस्वी झाली होती. चंद्राच्या उत्पत्तीशी संबंधित डेटा गोळा करण्यावर शास्त्रज्ञांचे लक्ष होते.

मात्र या मोहिमेदरम्यान एका अंतराळवीराने चंद्रवरील सर्व काम झाल्यानंतर एक वेगळेच आणि लक्षकेंद्रित करणारे काम केले होते. ज्याची माहिती कोणालाच नव्हती. नासाच्या मिशन चीफलाही याबाबत माहिती नव्हती.

चंद्रावर गोल्फ खेळले

नासाच्या अपोलो-14 या चंद्रावर गेलेल्या मोहिमेत जे अंतराळवीर होते त्यातील एक एलेन शेफर्ड हे गोल्फर होते. त्यांनी चंद्राच्या मोहिमेवर जाताना गोल्फ स्टिक्स आणि गोल्फ बॉलही नेले होते.

एलेन शेफर्ड यांनी चंद्रावर जाऊन अनेक महत्त्वाचे प्रयोग केले, वैज्ञानिक माहिती गोळा केली आणि त्यांनतर त्यांनी चंद्रावर गोल्फ खेळला. त्यांनी मारलेला पहिला चेंडू चंद्राच्या पृष्ठभागावर पडला त्याला जेव्हलिन कार्टर असे नाव देण्यात आले. शेफर्ड चंद्रावर गोल्फ खेळणारा पहिला व्यक्ती बनला.

स्पेस सूटमध्ये लपलेली गोल्फ स्टिक

शेफर्ड यांनी त्यांच्या स्पेससूटमध्ये गोल्फ स्टिक आणि गोल्फ बॉल नेले होते. शेफर्ड आणि त्यांच्या साथीदारांनी चंद्रावरून 4,500 दशलक्ष वर्षे जुना क्रिस्टलीय खडकाचा नमुना आणला होता. त्या खडकाचा रंग पूर्णपणे पांढरा होता.

तसेच शेफर्ड आणि त्यांच्या साथीदारांनी चंद्रावर जास्त वेळ चालण्याचा विक्रम देखील केला होता. या दोन अंतराळवीरांनी 9 तासांपेक्षा जास्त वेळ चंद्रावर घालवला होता.

५० वर्षांनंतर गोल्फ बॉल शोधल्याचा नासाचा दावा

नासाकडून चंद्रावर खेळली गेलेली स्टिक अमेरिकन गोल्फ असोसिएशनच्या गोल्फ संग्रहालयात ठेवण्यात आली आहे. अनेकजण अमेरिकेत फिरायला गेल्यानंतर ही स्टिक पाहायला जातात. मात्र या घटनेच्या ५० वर्षानंतर नासाकडून चंद्रावर मारलेला गोल्फ बॉल सापडल्याचा दावा केला आहे.

अंतराळ संस्थेने दोन वर्षांपूर्वी चंद्राच्या पृष्ठभागाची अनेक छायाचित्रे आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून शेअर केली होती. या चित्रांमध्ये दोन्ही गोल्फ बॉलचे स्थान दिले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe