Neo Metro : अखेर ठरल म्हणायचं ! येत्या तीन महिन्यात निओ मेट्रो प्रकल्पाची पायाभरणीचं झालं फिक्स; देवेंद्र फडणवीस यांची माहिती

Ajay Patil
Published:
Nashik Neo Metro New Project

Neo Metro : या चालू वर्षात देशातील 9 राज्यात विधानसभा निवडणुकीचीं रणधुमाळी सुरू होणार आहे. शिवाय पुढल्या वर्षी देशात लोकसभा निवडणुकीचा देखील बिगुल वाजणार आहे. यामुळे वेगवेगळी विकासाची कामे सध्या हाती घेतली जात आहेत. अनेक प्रकल्पांचे लोकार्पण देखील सरकारच्या माध्यमातून केले जात आहे.

अशातच आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठी माहिती दिली आहे. फडणवीस यांनी निओ मेट्रो प्रकल्पाबाबत ही माहिती दिली आहे. येत्या तीन महिन्यात या प्रकल्पाचा नारळ फुटणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

गेल्या तीन वर्षांपासून वाट पाहत असलेल्या नाशिककरांना निओ मेट्रोची भेट लवकरच भेटणार असून पुढील तीन महिन्यात या प्रकल्पाचा शुभारंभ होईल अस आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिल आहे. फडणवीस यांनी नाशिक मध्ये शनिवारी ही माहिती दिली असून नासिक सह देशातील इतरही महत्त्वाच्या शहरात निओ मेट्रो प्रकल्प उभारायचा असल्याने या कामे विलंब होत असल्याचे त्यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

खरं पाहता, नाशिकला निओ मेट्रोची घोषणा तीन वर्षांपूर्वीच करण्यात आली होती. यासाठी निधीची अर्थसंकल्पात तरतूदही करण्यात आली. मात्र हा प्रकल्प दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आवडला असून याची व्याप्ती वाढवण्याचा निर्णय झाला आहे. आता देशातील इतरही महत्त्वाच्या शहरात निओ मेट्रो धावणार आहेत. देशात केवळ दोनच मेट्रो राहतील आता दुसरी मेट्रो ही टायर बेस राहणार आहे.

देशात इतरही महत्त्वाच्या शहरात या निओ मेट्रो सुरू करण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. हा प्रकल्प मेक इन इंडिया अंतर्गत तयार होणार असून पुढील आठवड्यात दिल्लीत या संदर्भात सादरीकरण होणार असल्याची बहुमूल्य माहिती देखील उपमुख्यमंत्री महोदय यांनी याप्रसंगी दिली आहे. सादरीकरणानंतर या प्रकल्पावर अंतिम निर्णय होणार आहे.

संपूर्ण देशात टायर बेस मेट्रो प्रकल्प येईल त्याचवेळी नाशिक मध्ये देखील निओ मेट्रोचे काम सुरू होणार असल्याचे चित्र आहे. उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दोन-तीन महिन्यात या प्रकल्पाचे काम नाशिकमध्ये सुरू होणार असल्याचे आश्वासन यावेळी दिले. या आश्वासनामुळे निश्चितच पुन्हा एकदा नासिक करांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe