Viral News : अनेकदा जगात अशा घटना घडत असतात ज्या अतिशय दुर्मिळ आणि अविश्वसनीय असतात. तुम्ही आत्तापर्यंत गाईला एक किंवा दोन वासरू झाल्याच्या घटना पहिल्या, ऐकल्या असतील. पण आम्ही तुम्हाला एका गाईने तब्बल चार वासरांना जन्म दिल्याचे सांगितले तर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. मात्र सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात ही घटना घडली आहे. ही दुर्मिळ आणि अविश्वसनीय अशी घटना असून परिसरात याला चमत्कारच म्हणावं लागेल अशा प्रतिक्रिया सध्या उमटत आहेत.
मोहोळ तालुक्यातील मौजे पापरी येथे एका पशुपालक शेतकऱ्याच्या गाईने चक्क चार वासरांना जन्म दिला असून ही चारही वासरे आणि अगदी अगदी ठणठणीत आहेत. यामुळे सध्या परिसरात या घटनेची सर्वदूर चर्चा पाहायला मिळत असून परिसरातील लोक पापरी गावातील या दुर्मिळ घटनेचे साक्षीदार होण्यासाठी गावात गर्दी करत आहेत.

पापरी गावातील गणेश लोंढे नामक पशुपालक शेतकऱ्याच्या गाईने चार वासरांना जन्म दिला आहे. गणेशने 2018 मध्ये ही गाय खरेदी केली. हिंदू सनातन धर्मात गाईला देवी चा दर्जा असल्याने त्यांनी आपल्या गाईचे नाव लक्ष्मी असं ठेवल. 2018 मध्ये खरेदी केलेल्या या गाईने आता चार वासरांना जन्म दिला आहे. ठिकाणी विशेष बाब अशी की 2018 पासून या गाईची आतापर्यंत चारदा प्रसूती झाली आहे.
पण या गाईने पहिल्यांदा चार वासरांना जन्म दिला आहे. त्यामुळे गणेश यांनी आमची लक्ष्मी खरंच लक्ष्मीचं रूप आहे असं यावेळी म्हटलं आहे. दरम्यान गणेशने याबाबत अधिक माहिती देताना सांगितलं की, गाईने एक खोंड आणि तीन कालवडी अशा चार वासरांना जन्म दिला आहे. गाईने सुरुवातीला खोंड जन्माला घातलं आणि नंतर मग तीन कालवडी जन्माला आल्या.
वासरे आणि गाय ठणठणीत असून गाईने एकदाचं चार वासरांना जन्म दिला असल्याने गणेश व कुटुंबीय आनंदी आहेत. दरम्यान लक्ष्मी गाईने चक्क चार वासरांना जन्म दिला असल्याने तालुक्यात या घटनेवर आश्चर्य व्यक्त होत असून सर्वत्र चर्चा होत आहे. परिसरातील काही पशुपालक शेतकरी याला लक्ष्मीचा चमत्कारच म्हणाव लागेल अशी देखील प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.