State Employee News : सध्या महाराष्ट्रात राज्य कर्मचारी आपल्या वेगवेगळ्या मागण्यांसाठी संपाचं हत्यार उपसत आहेत. अशातच आता राज्यातील अंगणवाडी सेविकांकडून 20 फेब्रुवारीपासून म्हणजेच सोमवारपासून बेमुदत संपाचा इशारा देण्यात आला आहे. पगार वाढीसाठी प्रामुख्याने हा संप पुकारला जाणार आहे.
पगारवाढीसह आपल्या वेगवेगळ्या प्रलंबित मागणीवर शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी या संपाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती देण्यात येत आहे. हा संप महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कृती समितीच्या माध्यमातून उभारला जात आहे. एका आकडेवारीनुसार महाराष्ट्रात एकूण दोन लाख अंगणवाडी कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र या कर्मचाऱ्यांना कामगार कल्याण कायद्याचे कोणतेच धोरण लागू होत नाही.

कामगार कल्याण कायद्यामध्ये असलेल्या कर्मचारी हिताचे संरक्षण आणि लाभ या कर्मचाऱ्यांना मिळत नसल्याने कमालीची नाराजी अंगणवाडी सेविकांमध्ये पाहायला मिळत आहे. यामुळे इतर अन्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे या कर्मचाऱ्यांना देखील वाढत्या महागाई भत्ता चा लाभ मिळावा, शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा, वेतन वाढ मिळावी, निवृत्त व मृत कर्मचाऱ्यांना थकीत सेवा समाप्ती लाभ दिला जावा, ग्रॅच्यूटीची अंमलबजावणी करावी यासारख्या इत्यादी प्रलंबित मागणीकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी हा बेमुदत संप करण्यात येत आहे.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या या प्रलंबित मागण्या शासनाकडून गांभीर्याने घेतल्या जात नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष आहे. यामुळे राज्य शासनाने कर्मचाऱ्यांच्या या मागण्यावर सकारात्मक अशी चर्चा करून निर्णय घ्यावा यासाठी 20 फेब्रुवारीपासून ते मुदत संप पुकारला आहे. 19 फेब्रुवारी पर्यंत अंगणवाडी सेविकांचे प्रश्न निकाली निघाले नाही तर २० तारखेपासून हा बेमुदत संप सुरू होईल असं कृती समितीच्या माध्यमातून सांगितलं गेलं आहे.
हा राज्यव्यापी संप राहणार असून राज्यातील दोन लाख अंगणवाडी कर्मचारी या संपामध्ये सामील होणार आहेत. निश्चितच या संपाकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहणार असून अंगणवाडी सेविकांना पगार वाढ मिळते का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.